LSG vs MI, IPL 2023 Eliminator Live: लखनौ आणि मुंबई यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

LSG vs MI Eliminator Live : मुंबई आणि लखनौ यांच्यामध्ये चेपॉक स्टेडिअमवर सामना रंगणार आहे...

एबीपी माझा ब्युरोLast Updated: 24 May 2023 11:22 PM

पार्श्वभूमी

IPL 2023 Eliminator, MI vs LSG:  आज इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) सोळाव्या हंगामातील पहिला एलिमिनेटर (IPL 2023 Eliminator) सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)...More

लखनौचे आव्हान संपले, मुंबईकडून सव्याज परफेड, आता सामना गुजरातसोबत

 


आकाश मधवालच्या भेदक माऱ्यापुढे लखनौच्या संघाची दाणादाण उडाली.  मुंबईने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौचा संघ 16.3 षटकात 101 धावांत गारद झाला.  लखनौकडून मार्कस स्टॉयनिस याने एकाकी झुंज दिली. मार्कस स्टॉयनिस याने 40 धावांची खेळी केली. मुंबईकडून आकाश मधवाल याने पाच फलंदाजांना तंबूत धाडले.