LSG Vs MI:  मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या आयपीएल 2022च्या 37 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं मुंबईसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फंलदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या लखनौच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 168 धावा केल्या आहेत. लखनौचा कर्णधार केएल राहुलनं शतक ठोकलं.


नाणेफेक गमावून लखनौच्या संघाची सुरुवात खराब झाली. लखनौच्या डावातील पहिल्याच चौथ्याच षटकात क्विंटन डी कॉकनं आपली विकेट्स गमावली. त्यानंतर कर्णधार केएल राहुल आणि मनिष पांडेनं संघाचा डाव सावरला.परंतु, पोलार्डच्या गोलंदाजीवर 12 व्या षटकात मनीष पांडे बाद झाला. त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र, केएल राहुलनं एका बाजूनं संभाळून ठेवली. तो अखेरच्या षटकापर्यंत क्रिजवर उभा राहिला. त्यानं 62 चेंडूत शतक ठोकलं. ज्यामुळं लखनौच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून लखनौसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं. मुंबईकडून  रिले मेरेडिथनं आणि पोलार्ड यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या. तर, डॅनियल सॅम्स आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येक एक-एक विकेट्स घेतली.


लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन:
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), केएल राहुल (कर्णधार), मनीष पांडे, कृणाल पंड्या, दीपक हुडा, आयुष बदोनी, मार्कस स्टॉयनिस, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई, मोहसिन खान.


मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: 
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, किरॉन पोलार्ड, हृतिक शोकीन, डॅनियल सॅम्स, जयदेव उनाडकट, रिले मेरेडिथ, जसप्रीत बुमराह.


हे देखील वाचा-