IPL 2022: आस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) आणि मायकेल क्लार्क (Michael Clarke) यांची जोडी एकेकाळी संघासाठी मजबूत बाजू मानली जात होती.परंतु, काही काळानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. अँड्र्यू सायमंड्स त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर होता. दरम्यान, मायकल क्लार्क ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असताना अँड्र्यू सायमंड्सनं संघाच्या बैठकीतून बाहेर पडला. ज्यामुळं त्याला संघातून वगळण्यात आलं होतं. असं म्हटलं जातं. 2008 मध्ये एकदिवसीय मालिका खेळण्यापूर्वी अँड्र्यू सायमंड्स दारूच्या नशेत असल्याचा आरोप मायकल क्लार्क केला होता. 2015 साली अँड्र्यू सायमंड्सनं मायकल क्लार्कवर जोरदार टीकाही केली होती.


अँड्र्यू सायमंड्स काय म्हणाला?
मायकल क्लार्कनं 2015 मध्ये ऍशेस डायरीमध्ये असं लिहलं होतं की,अँड्र्यू सायमंड्स टीव्हीवर माझ्या नेतृत्वावर टीका करण्यासाठी गेला. सायमंड्स असा व्यक्ती आहे, ज्याच्यासाठी कोणावर चारित्र्यावर चिखलफेक करणं मोठी गोष्ट नाही, असं मायकल क्लार्क त्यावेळी म्हणाला होता. दरम्यान, ब्रेट ली पॉडकास्टवर बोलताना अँड्र्यू सायमंड्सनं याविषयावर भाष्य केलं आहे. आयपीएलमध्ये चांगला पगार मिळाल्यानंतर त्यांच्या मैत्रीत दुरावा आल्याचं त्यानं सांगितलं. आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच 2008 साली सायमंड्स हा सर्वात महागडा परदेशी खेळाडू होता. पहिल्या हंगामात डेक्कन चार्जर्सनं त्याला 5.4  कोटी रुपयांना विकत घेतलं.


मी नेहमी मायकेल क्लार्कची काळजी घेतली- अँड्र्यू सायमंड्स
मायकल क्लार्कसोबतची माझी मैत्री चांगली होती. ज्यावेळी त्यानं ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून खेळताना सुरुवात केली. त्यानं संघात आल्यानंतर मी त्याची पूर्ण काळजी घेतली. मला असं वाटतं की, आयपीएलचया पैशांमुळं आमच्या नात्यात दुरावा आल्याचं सायमंड्स म्हणाला आहे. तसेच आता आमची मैत्री उरली नाही, पण मी कम्फर्टेबल आहे.


हे देखील वाचा-