LSG Vs MI: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 37 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्य (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) यांच्या थरार पाहायला मिळणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 


कधी, कुठे पाहणार सामना?
आज 24 एप्रिल रोजी होणारा मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपरजायंट्स भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईची निराशाजनक कामगिरी
 मुंबईच्या संघाचं नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करत आहेत. तर, केएल राहुलकडं (KL Rahul)  लखनौच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघानं निराशाजनक कामगिरी केली आहे. मुंबईनं आतापर्यंत सात सामने खेळले असून एकही सामना जिंकलेला नाही. तर, दुसरीकडं लखनौच्या संघानं सात पैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. 


लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन:
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), केएल राहुल (कर्णधार), मनीष पांडे, कृणाल पंड्या, दीपक हुडा, आयुष बदोनी, मार्कस स्टॉयनिस, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई, मोहसिन खान.


मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: 
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, किरॉन पोलार्ड, हृतिक शोकीन, डॅनियल सॅम्स, जयदेव उनाडकट, रिले मेरेडिथ, जसप्रीत बुमराह.


हे देखील वाचा-