LSG vs GT, IPL 2023 Live : गुजरातचा लखनौवर सात धावांनी विजय

LSG vs GT, IPL 2023 Live : गुजरात (Gujrat Titans) आणि लखनौ (Lucknow Super Giants) या दोन संघांमध्ये लढत होणार आहे.

नामदेव कुंभार Last Updated: 22 Apr 2023 07:13 PM
गुजरातचा लखनौवर सात धावांनी विजय

गुजरातचा लखनौवर सात धावांनी विजय

लखनौला आणखी एक धक्का, दीपक हुड्डा बाद

लखनौला आणखी एक धक्का, दीपक हुड्डा बाद

लखनौला लागोपाठ दोन धक्के, राहुलनंतर स्टॉयनिसही बाद

लखनौला लागोपाठ दोन धक्के, राहुलनंतर स्टॉयनिसही बाद

मोक्याच्या क्षणी केएल राहुल बाद

मोक्याच्या क्षणी केएल राहुल बाद... लखनौ पराभवाच्या छायेत

लखनौला ११ चेंडूत १६ धावांची गरज

लखनौला ११ चेंडूत १६ धावांची गरज

सामना रोमांचक स्थितीत

सामना रोमांचक स्थितीत

लखनौला तिसरा धक्का, निकोलस पूरन बाद

लखनौला तिसरा धक्का, निकोलस पूरन बाद

कृणाल पांड्या बाद, लखनौला दुसरा धक्का

कृणाल पांड्या बाद, लखनौला दुसरा धक्का

केएल राहुलचे दमदार अर्धशतक

केएल राहुलचे दमदार अर्धशतक... ३८ चेंडूत झळकावले अर्धशतक

लखनौला पहिला धक्का, मायर्स बाद

लखनौला पहिला धक्का, मायर्स बाद

केएल राहुल-मायर्सची दमदार सलामी

केएल राहुल-मायर्सची दमदार सलामी... पाच षटकात ५० धावांची भागिदारी केली...

गुजरातची 135 धावांपर्यंत मजल

गुजरातची 135 धावांपर्यंत मजल

हार्दिक पांड्या बाद

हार्दिक पांड्या बाद

गुजरातला चौथा धक्का, विजय शंकर बाद

गुजरातला चौथा धक्का, विजय शंकर बाद

गुजरातला तिसरा धक्का, अभिनव मुकुंद बाद

गुजरातला तिसरा धक्का, अभिनव मुकुंद बाद झाला... अमित मिश्राने अभिनवला पाठवले तंबूत

गुजरातला दुसरा धक्का, साहा बाद

गुजरातला दुसरा धक्का, साहा बाद झाला.. कृणाल पांड्याने दुसरी विकेट घेतली.. साहा ४७ धावांवर बाद झाला.. कर्णधार हार्दिक पांड्या अद्याप खेळपट्टीवर

हार्दिक पांड्या-साहाने गुजरातचा डाव सावरला

हार्दिक पांड्या-साहाने गुजरातचा डाव सावरला.... गुजरात एख बाद ५९ धावा

गुजरातला पहिला धक्का, शुभमन गिल बाद

गुजरातला पहिला धक्का, शुभमन गिल बाद झाला आहे. कृणाल पांड्याने केले बाद

गिल-साहा मैदानावर

शुभमन गिल आणि वृद्धीमान साहा मैदानावर.... नवीन उल हक याच्याकडे चेंडू

लखनौ सुपर जायंट्सची प्लेईंग इलेव्हन -  

काइल मायर्स,केएल राहुल (कर्णधार), दीपक हुड्डा, कृणाल पांड्या, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, रवि बिश्नोई, आवेश खान, नवीन उल हक, अमित मिश्रा

गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन: 

ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा

Ekana Stadium Lucknow Pitch Report : इकाना खेळपट्टी कशी आहे?

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील हा सामना भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर (Ekana Stadium) होणार आहे. टी 20 साठी ही खेळपट्टी खूपच संतुलित आहे. खेळपट्टी फलंदाजीसोबतच गोलंदाजांसाठीही उपयुक्त आहे. येथे खेळल्या गेलेल्या एकूण सहा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने पाच वेळा विजय मिळवला आहे. अशा वेळी नाणेफेक जिंकणं महत्त्वाचं ठरू शकतं. तसेच, पहिल्यांदा फलंदाजी करताना सरासरी 151 धावा होतात. या खेळपट्टीवर फिरकीपटू वर्चस्व गाजवू शकतात. 

GT vs LSG Head To Head : हेड टू हेड आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये लखनौ (LSG) आणि गुजरात (GT) या संघांमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये गुजरात संघाचं पारड जड दिसून आलं आहे. गुजरात टायटन्स संघाने दोन्ही सामने जिंकले आहेत, पण लखनौला एकही सामना जिंकता आलेला नाही. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय

हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय

थोड्याच वेळात होणार सामना

पार्श्वभूमी

LSG vs GT IPL 2023  : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आज गुजरात (Gujrat Titans) आणि लखनौ (Lucknow Super Giants) या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. 16 व्या हंगामातील 30 वा सामना आज, 22 एप्रिलला पाहायला मिळणार आहे. लखनौच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. इकाना स्टेडिअमवर (Ekana Sports City Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. 

LSG vs GT IPL 2023 : लखनौ की गुजरात कोण मारणार बाजी?

इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 30 व्या सामन्यात शनिवारी, 22 एप्रिलला गतविजेत्या गुजरात टायटन्सचा (GT) सामना लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात इकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्त्वात लखनौ संघ पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे तर, गुजरात चौथ्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सला मागील सामन्यात त्यांच्या घरच्या मैदानावर संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात राजस्थान रॉयल्सकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. त्याउलट लखनौ सुपर जायंट्स संघाने मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे.

GT vs LSG Head To Head : हेड टू हेड आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये लखनौ (LSG) आणि गुजरात (GT) या संघांमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये गुजरात संघाचं पारड जड दिसून आलं आहे. गुजरात टायटन्स संघाने दोन्ही सामने जिंकले आहेत, पण लखनौला एकही सामना जिंकता आलेला नाही. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Ekana Stadium Lucknow Pitch Report : इकाना खेळपट्टी कशी आहे?

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील हा सामना भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर (Ekana Stadium) होणार आहे. टी 20 साठी ही खेळपट्टी खूपच संतुलित आहे. खेळपट्टी फलंदाजीसोबतच गोलंदाजांसाठीही उपयुक्त आहे. येथे खेळल्या गेलेल्या एकूण सहा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने पाच वेळा विजय मिळवला आहे. अशा वेळी नाणेफेक जिंकणं महत्त्वाचं ठरू शकतं. तसेच, पहिल्यांदा फलंदाजी करताना सरासरी 151 धावा होतात. या खेळपट्टीवर फिरकीपटू वर्चस्व गाजवू शकतात.

GT vs LSG IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

लखनौ (LSG) आणि गुजरात (GT) यांच्यात 22 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना लखनौमधील एकाना स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.