KKR vs SRH, IPL 2023 Live: हैदराबाद-कोलकाता यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

KKR vs SRH Match: कोलकाता आणि हैदराबाद यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने असतील. हैदराबाने कोलत्याला कोलकात्यात हरवले होते. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आज कोलताता मैदानात उतरेल.

नामदेव कुंभार Last Updated: 04 May 2023 11:22 PM
कोलकात्याने हैदराबादचा केला पराभव

कोलकात्याने हैदराबादचा केला पराभव

हैदराबादला विजयासाठी दोन चेंडूत सात धावांची गरज

हैदराबादला विजयासाठी दोन चेंडूत सात धावांची गरज

मयंक अग्रवालचा विक्रम

मयंक अग्रवाल याने आयपीएलमध्ये दोन हजार ५०० धावांचा टप्पा पार केला. 

हैदरबादला चौथा धक्का

 


राहुल त्रिपाठीनंतर हॅरी ब्रूकही बाद झालाय. ब्रूकला खातेही उघडता आले नाही

अभिषेक शर्मा बाद

शार्दूल ठाकूर याने अभिषेख सर्माला नऊ धावांवर बाद केले... हैदराबादला दुसरा धक्का

हैदराबादला पहिला धक्का

मयंक अग्रवाल १८ धावा काढून बाद झालाय. हर्षित राणा याने अग्रवाल याला तंबूचा रस्ता दाखवलाय

कोलकात्याची १७१ धावांपर्यंत मजल

कोलकात्याची १७१ धावांपर्यंत मजल

नीतीश राणा-रसेलची महत्वाची खेळी -

 


तीन विकेट झटपट गेल्यानंतर कर्णधार नीतीश राणा याने कोलकात्याचा डाव सावरला. रिंकूच्या मदतीने राणा याने कोलकात्याची धावसंख्या हालती ठेवली. नीतीश राणा याने रिंकूसोबत चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूत ६१ धावांची भागिदारी केली. राणा बाद झाल्यानंतर रिंकूने रसेलसोबत १८ चेंडूत ३१ धावांची भागिदारी केली. कर्णधार नीतीश राणा याने ३१ चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले. यामध्ये राणा याने तीन चौकार आणि तीन षटकार लगावले. तर आंद्रे रसेल याने १५ चेंडूत २४ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. नीतीश राणा याला हैदराबादच्या कर्णधाराने बाद केले. तर रसेल याला मार्कंडेय याने तंबूचा रस्ता दाखवला. 


 

रिंकूची पुन्हा फटकेबाजी - 

 


रिंकू सिंह याने मोक्याच्या क्षणी वादळी फलंदाजी केली. पहिल्यांदा संयमी फलंदाजी केली. त्यानंतर अखेरीस धावा जमवल्या. रिंकू याने ४६ धावांची निर्णायाक खेळी केली. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रिंकू बाद झाला. अब्दुल समद याने जबरदस्त झेल घेतला. रिंकू सिंह याने कर्णधार नीतीश राणा याच्यासमोबत ६१ धावांची महत्वाची भागिदारी केली. त्यानंतर रसेलसोबत झटपट धावा जोडल्या.

कोलकात्याला आठवा धक्का

रिंकू सिंह मोठा फटक मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. अब्दुल समद याने जबरदस्त झेल घेतला. रिंकू ४६ धावांवर बाद झाला.

कोलकात्यासा सातवा धक्का

शार्दुल ठाकूरच्या रुपाने कोलकात्याला सातवा धक्का बसलाय

हैदराबादला सहावा धक्का

हैदराबादला आणखी एक धक्का बसला आहे. भुवनेश्वर कुमार याने नारायणला बाद केलेय

कोलकात्याला मोठा धक्का

आंद्रे रसेल याला मार्केंडेय याने २४ धावांवर बाद केलेय

कोलकात्याला चौथा धक्का, कर्णधार तंबूत

कोलकात्याला चौथा धक्का, कर्णधार नीतीश राणा ४२ धावांवर बाद झालाय. एडन मार्करम याने राणाला बाद केले

कोलकात्याला तिसरा धक्का बसला

कोलकात्याला तिसरा धक्का बसला आहे. जेसन रॉय २० धावांवर बाद झालाय. कार्तिक त्यागीने जेसनला पाठवले तंबूत

एकाच षटकात कोलकात्याला दोन धक्के

एकाच षटकात कोलकात्याला दोन धक्के बसले आहेत. वेंकटेश अय्यर सात धावा काढून बाद झाला.

सनरायजर्स हैदराबादचे ११ शिलेदार कोणते ?

मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडेन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, अब्दुल समद, मार्को यानसेन, मयंक मारकंडे, भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी आणि टी नटराजन. 

कोलकाता नाइट रायडर्सची प्लेईंग ११ -

रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, वेंकटेश अय्यर, नितीश राणा (कप्तान), आंद्रे रसेल, रिंकू सिंह, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.


 

कोलकात्याच्या संघात दोन बदल

SRH vs KKR, IPL 2023 : कोलकात्याचा कर्णधार नीतीश राणा याने नाणेपेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्करमच्या नेतृत्वातील हैदराबाद संघ राजीव गांधी स्टेडियमवर प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. नीतीश राणा याने नाणेफेक जिंकून प्रथम  गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्याशिवाय कोलकात्याच्या संघात दोन बदल करण्यात आले आहे. कोलकात्याने एन जगदीशन आणि डेविड विज यांना संघाबाहेर बसवलेय.  हैदराबादच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. कार्तिक त्यागीला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलेय.

कोलकात्याने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय

कोलकात्याने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय

पिच रिपोर्ट –







 

हेड टू हेड –

 


सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये आतापर्यंत 24 सामने झाले आहेत. दोन्ही संघातील आकडेवारीवरुन कोलकाता संघाचे पारडे जड दिसत आहे. कोलकाताने आतापर्यंत 24 पैकी 15 सामन्यात विजय मिळवला आहे. तर हैदराबादला फक्त एका सामन्यात बाजी मारता आली आहे. दोन्ही संघातील अखेरच्या पाच सामन्याचा विचार केला तर हैदराबाद संघ वरचढ असल्याचे दिसतेय. मागील पाच सामन्यात हैदराबादने तीन सामने जिंकले आहेत. त्याशिवाय यंदाच्या हंगामातील पहिला सामनाही हैदराबादने जिंकला आहे. 

रसेलचा फ्लॉप शो - 

 


आतापर्यंत आंद्रे रसेल लयीत दिसला नाही. गोलंदाजी आणि फलंदाजीत रसेल फ्लॉप जातोय. त्याची फिटनेसही कोलकात्याची डोकेदुखी वाढवणारी आहे. आतापर्यंत रसेल याला एकाही सामन्यात चार षटके गोलंदाजी करता आलेली नाही. रिंकू सिंह याने काही सामन्यात वादळी फलंदाजी केली आहे. हीच काय ती नीतीश राणा आणि टीमसाठी जमेची बाजू आहे. 

हैदराबादपुढे काय आव्हाने - 

 


हैदराबादला आघाडीच्या फंलदाजांकडून हवे तसे योगदान मिळत नाही. मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. कर्णधार एडन मार्करम यालाही आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. आघाडीचे फलंदाज सातत्याने फ्लॉप जात आहेत, हैदराबादपुढे हेच मोठे आव्हान आहे. हैदराबादला विजयासाठी आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याची गरज आहे. 


 

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 47, KKR vs SRH:  हैदराबाद आणि कोलकाता या तळाच्या दोन संघामध्ये आज सामना होत आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील. गुणतालिकेत ऑरेंज आर्मी सहा गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. तर नाईट रायडर्स सहा गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. कोलकात्याने नऊ सामन्यात फक्त तीन विजय मिळवले आहेत. तर हैदराबाद संघाने आठ सामन्यात तीन विजयावर शिक्कामोर्तब केलेय. कोलकाता आणि हैदराबाद यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने असतील. हैदराबाने कोलत्याला कोलकात्यात हरवले होते. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आज कोलताता मैदानात उतरेल. तळाच्या दोन संघातील आजचा सामना रोमांचक होईल. 







 






सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाइट रायडर्सला इडन गार्ड्नस मैदानावर 23 धावांनी हरवले होते. या  सामन्यात हॅरी ब्रूक याने शतकी खेळी केली होती. हे यंदाच्या आयपीएलमधील पहिले शतक होते. दोन्ही संघातील हा सामना रोमांचक झाला होता. पण अखेरीस हैदराबादने बाजी मारली. हैदराबादने कोलकात्याला घरच्या मैदानावर हरवले. याच पराभवाचा बदला घेण्यासाठी कोलकाता मैदानावर उतरणार आहे.  कोलकाता आणि हैदराबाद दोन्ही संघाला प्लेऑफधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय गरजेचा आहे. त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. हैदराबादने आपल्या मागील सामन्यात दिल्लीचा पराभव केला होता. त्यानंतर मार्करमच्या नेतृत्वातील संघाचा आत्मविश्वास बळावला असेल. तर कोलकाता नाइट राइडर्स संघाला आपल्या अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. गुजरातने कोलकात्याचा पराभव केला होता. कोलकाता विजयाच्या पटरीवर परतण्यास उत्सुक असेल तर हैदराबाद विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही संघातील सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. 









कोलकाताच्या फलंदाजांची खराब कामगिरी -  


फलंदाजांच्या खराब कामगिरीचा फटका कोलकाता संघाला बसला आहे. नियमीत कर्णधार श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शाकिब अल हसन या दोन अनुभवी खेळाडूंची कमी कोलकात्याला जाणवत आहे. चेन्नईविरोधात कोलकात्याच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. फलंदाजीसाठी पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर नांगी टाकली.  वेंकटेश अय्यर,  नितीश राणा, एन जगदीशन, सुनील नारायण आणि आंद्रे रसेल यासारख्या फलंदाजांनी विकेट फेकल्या.  


रसेलचा फ्लॉप शो - 


आतापर्यंत आंद्रे रसेल लयीत दिसला नाही. गोलंदाजी आणि फलंदाजीत रसेल फ्लॉप जातोय. त्याची फिटनेसही कोलकात्याची डोकेदुखी वाढवणारी आहे. आतापर्यंत रसेल याला एकाही सामन्यात चार षटके गोलंदाजी करता आलेली नाही. रिंकू सिंह याने काही सामन्यात वादळी फलंदाजी केली आहे. हीच काय ती नीतीश राणा आणि टीमसाठी जमेची बाजू आहे. 


हैदराबादपुढे काय आव्हाने - 


हैदराबादला आघाडीच्या फंलदाजांकडून हवे तसे योगदान मिळत नाही. मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. कर्णधार एडन मार्करम यालाही आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. आघाडीचे फलंदाज सातत्याने फ्लॉप जात आहेत, हैदराबादपुढे हेच मोठे आव्हान आहे. हैदराबादला विजयासाठी आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याची गरज आहे. 



कसे आहेत दोन्ही संघ -


सनरायजर्स हैदराबाद : विवरांत शर्मा, समर्थ व्यास, संवीर सिंह, उपेंद्र सिंह यादव, मयंक डागर, नीतीश कुमार रेड्डी, अकील होसेन, अनमोलप्रीत सिंह, अब्दुल समद, उमरान मलिक, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, एडन मार्करम (कर्णधार), मार्को जानसन, ग्लेन फिलिप्स, फजलहक फारूकी, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन, आदिल राशिद, मयंक मारकंडे


कोलकाता नाइट राइडर्स : नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, रहमानुल्लाह गुरबाज, सुयश शर्मा, कुलवंत खेजरोलिया, अनुकुल राय, लॉकी फर्ग्यूसन, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, उमेश यादव, हर्षित राणा, टिम साउदी, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, नारायण जगदीशन, लिटन दास, मनदीप सिंह


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.