KKR vs RCB, IPL 2023 Live : आरसीबीचा दारुण पराभव, कोलकात्याने विजयाचे खाते उघडले

KKR vs RCB Match : आरसीबी विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी मैदानावर उतरेल. तर कोलकाता आपल्या पहिल्या विजयासाठी रणांगणात उतरेल.

नामदेव कुंभार Last Updated: 06 Apr 2023 10:54 PM
कोलकात्याची विजयाकडे आगेकूच

कोलकात्याची विजयाकडे आगेकूच.. आरसीबीचे 8 गडी तंबूत

आरसीबीचा अर्धा संघ तंबूत

आरसीबीचा अर्धा संघ तंबूत... आता शाहबाज अहमद बाद

चक्रवर्तीच्या जाळ्यात अडकली आरसीबी

वरुण चक्रवर्तीचा भेदक मारा.. आरसीबीच्या तिसऱ्या फलंदाजाला तंबूत पाठवले. 

केजीएफ बाद, आरसीबीची फंलदाजी ढेफाळली

कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस स्वस्तात बाद झाले आहेत. आरसीबीची फंलदाजी ढासळली. 

आरसीबीला दुसरा धक्का, फाफ तंबूत

विराट कोहलीनंतर कर्णधार फाफ डु प्लेसिसही बाद झाला. आरसीबीला दुसरा धक्का बसलाय. 

सुनील नारायणच्या जाळ्यात अडकला विराट

सुनील नारायणच्या जाळ्यात अडकला विराट कोहली


 


विराट कोहली 21 धावा काढून बाद झाला

कोलकात्याची 204 धावांपर्यंत मजल

रहमानुल्लाह गुरबाजची दमदार सलामी आणि लॉर्ड शार्दुलच्या फिनिशिंगच्या जोरावर कोलकाताने निर्धारित 20 षटकात 7 विकेटच्या मोबदल्यात 204 धावा केल्या. लॉर्ड शार्दुल ठाकूर याने 68, रहमानुल्लाह गुरबाज याने 57 तर रिंकू सिंह याने 46 धावांची खेळी केली. आरसीबीकडून डेविड विली आणि कर्ण शर्मा यांनी भेदक मारा केला. कोलकाताने आरसीबीला विजयासाठी 205 धावांचे आव्हान  दिले आहे. 

कोलकात्याला सहावा धक्का, रिंकू बाद

कोलकात्याला सहावा धक्का, रिंकू सिंह बाद

शार्दुल ठाकूरचे दमदार अर्धशतक

शार्दुल ठाकूरचे दमदार अर्धशतक

लॉर्डचा फटकेबाजी, चौकार-षटकारांचा पाडला पाऊस

शार्दुल ठाकूर याने फटकेबाजी सुरु केली आहे. 18 चेंडूत 46 धावा केल्या आहेत

आंद्रे रसेल बाद

आंद्रे रसेल शून्यावर बाद झाला.. कोलकात्याला मोठा धक्का बसलाय

कोलकात्याला चौथा धक्का, गुरबाज बाद

कोलकात्याला चौथा धक्का, अर्धशतकानंतर गुरबाज बाद

कोलकात्याला मोठा धक्का, कर्णधार तंबूत

नितीश राणाच्या रुपाने कोलकात्याला तिसरा धक्का बसला आहे. नितीश राणा एक धाव काढून तंबूत परतला. ब्रेसवेलने राणाला बाद केले.

कोलकात्याला सलग दुसरा धक्का

डेविड विलीने कोलकात्याला सलग दुसरा धक्का दिलाय. वेंकटेश अय्यरनंतर मनदीप बाद

डेविड विलीचा कोलकात्याला धक्का, वेंकटेश अय्यर बाद

डेविड विलाच्या चेंडूवर वेंकटेश अय्यर त्रिफाळाचीत झाला. वेंकटेश अय्यर तीन धावा काढून बाद झाला.

शाहरुख खान ईडन गार्डनवर, चाहत्यांचा कल्ला

वेंकटेश अय्यर-गुरबाज सलामीला

कोलकात्याकडून वेंकटेश अय्यर आणि गुरबाज सलामीला उतले.. तर मोहम्मद सिराजने पहिले षटक टाकले

शाहरुख खान ईडन गार्डनवर

कोलकाता संघाला सपोर्ट करण्यासाठी शाहरुख खान ईडन गार्डन स्टेडिअमवर पोहचला आहे.

अभिनेत्री जुही चावला इडन गार्डनवर

कोलकाता आणि आरसीबी यांच्यातील सामना पाहण्यासाठी अभिनेत्री जुही चावला इडन गार्डनवर आली आहे. कोलकाता संघाने व्हिडीओ पोस्ट केला आहे.  शाहरुख खानही सामना पाहण्यासाठी येणार असल्याचे वृत्त आहे.  





KKR vs RCB Live : आरसीबीची प्लेईंग 11

विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मायकल ब्रेसवेल, शाहबाज अहमद, डेविड विली, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज 

RCB vs KKR Live Score : कोलकाता नाइट रायडर्सची प्लेईंग 11, कुणाला संधी ? 

मनदीप सिंह, रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकुर, सुनील नारायण, टिम साउदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती 

आरसीबीने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

आरसीबीने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

ईडन गार्डनवर चाहत्यांची गर्दी

IPL RCB vs KKR : कोलकाताच्या मैदानावर आरसीबीची कसोटी

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स् (KKR) यांच्यात नववा सामना रंगणार आहे. हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. दोन्ही संघांचा आज यंदाच्या मोसमातील (IPL 2023) दुसरा सामना असेल. याआधीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्स (MI) विरोधात पहिला विजय मिळवला होता. त्यामुळे आरसीबी विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी मैदानावर उतरेल. तर कोलकाता आपल्या पहिल्या विजयासाठी रणांगणात उतरेल. आयपीएल 2023 मध्ये याआधीच्या सामन्या कोलकाता नाईट रायडर्सला पंजाब किंग्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता

IPL 2023 RCB vs KKR : आंद्रे रसलचा विरुद्ध विराट कोहली लढत

कोलकातातील ईडन गार्डन्स मैदानावर आंद्रे रसलने एकूण 24 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 699 धावांचा पल्ला गाठला आहे. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 200 हून अधिकचा आहे. तसेच त्याने चार अर्धशतकंही झळकावली आहेत. त्यामुळे या सामन्या आंद्रे रसलचा झंझावात की कोहलीची 'विराट' खेळी नक्की काय पाहायला मिळतं हे उत्सुकतेच ठरणार आहे.

IPL 2023, RCB vs KKR Match Preview : आरसीबी आणि कोलकाता यांच्यात लढत

कोलकाता नाईट रायडर्स इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या हंगामातील त्यांच्या पहिल्या विजयासाठी तयारी करत आहेत. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडिअमवर हा बहुप्रतीक्षित सामना होणार आहे. कोलकाताला यंदाच्या हंगामातील त्यांच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून सात विकेट्सने पराभव पत्करावा लागला. पंजाब किंग्सने डकवर्थ लुईस नियमानुसार (DLS) कोलकाता नाईट रायडर्सवर सात धावांनी विजय मिळवला.


दुसरीकडे, बंगळुरू संघाने त्यांच्या आयपीएल 2023 च्या प्रवासाची विजयी सुरुवात केली. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीने पाच वेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सवर आठ गडी राखून शानदार विजय मिळवला. विराट कोहली हा सामन्याचा हिरो ठरला. कोहलीने शानदार 82 धावांची नाबाद खेळी करून बंगळुरूला विजय मिळवून दिला.

RCB vs KKR Head to Head : कुणाचं पारड जड?

आरसीबी आणि कोलकाता यांच्या आयपीएल स्पर्धेमध्ये एकूण 30 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये कोलकाता वरचढ ठरला आहे. कोलताताने 30 पैकी 16 सामने जिंकले तर, बंगळुरुला 14 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. दोन्ही संघानी सर्वाधिक 200 हून अधिक धावांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक ठरणार आहे.

IPL 2023,RCB vs KKR : कोलकाता खातं उघडणार की आरसीबी बाजी मारणार?

इंडियन प्रीमियर लीगचा नववा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघ तब्बल चार वर्षांनंतर त्यांच्या घरच्या मैदानावर परतणार आहे. अशा परिस्थितीत प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे केकेआरच्या संघाचा समतोल बिघडला आहे. यामुळे ईडन गार्डन्स मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याकडे कोलकाताच्या चाहत्यांचं विशेष लक्ष असेल. दुसरीकडे, अनेक स्टार खेळाडूं असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) संघ आपला पहिला सामना जिंकल्यामुळे  चुरशी लढतीस तयार आहे. 

Eden Gardens Pitch Report : ईडन गार्डनची खेळपट्टी कशी आहे?

आज आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना कोलकाताच्या घरच्या ईडन गार्डन मैदानावर पार पडणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमची (Eden Gardens) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या स्टेडियमच्या लहान आकारामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान, या मैदानावर दव महत्त्वाची भूमिका बजावते. दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळू लागते, त्यानंतर धावा काढणं कठीण होतं.

लाईव्ह सामना कुठे पाहाल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' ॲपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

KKR Playing XI : कोलकाता संभाव्य प्लेईंग 11

रिंकू सिंह, नितीश राणा (कर्णधार), वॉरियर, जेसन रॉय, आदि रसेल, सुनिल नारायण, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव

RCB Playing XI : आरसीबी संभाव्य प्लेईंग 11

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, डीजे विली, अनुज रावत, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आकाश दीप, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, कर्ण शर्मा

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 9, KKR vs RCB : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स् (KKR) यांच्यात आज सामना रंगणार आहे. हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. दोन्ही संघांचा आज यंदाच्या मोसमातील (IPL 2023) दुसरा सामना असेल. याआधीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्स (MI) विरोधात पहिला विजय मिळवला होता. त्यामुळे आरसीबी विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी मैदानावर उतरेल. तर कोलकाता आपल्या पहिल्या विजयासाठी रणांगणात उतरेल. आयपीएल 2023 मध्ये याआधीच्या सामन्या कोलकाता नाईट रायडर्सला पंजाब किंग्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.


IPL 2023, RCB vs KKR Match Preview : आरसीबी आणि कोलकाता यांच्यात लढत
कोलकाता नाईट रायडर्स इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या हंगामातील त्यांच्या पहिल्या विजयासाठी तयारी करत आहेत. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडिअमवर हा बहुप्रतीक्षित सामना होणार आहे. कोलकाताला यंदाच्या हंगामातील त्यांच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून सात विकेट्सने पराभव पत्करावा लागला. पंजाब किंग्सने डकवर्थ लुईस नियमानुसार (DLS) कोलकाता नाईट रायडर्सवर सात धावांनी विजय मिळवला.


दुसरीकडे, बंगळुरू संघाने त्यांच्या आयपीएल 2023 च्या प्रवासाची विजयी सुरुवात केली. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीने पाच वेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सवर आठ गडी राखून शानदार विजय मिळवला. विराट कोहली हा सामन्याचा हिरो ठरला. कोहलीने शानदार 82 धावांची नाबाद खेळी करून बंगळुरूला विजय मिळवून दिला.


RCB vs KKR Head to Head : कुणाचं पारड जड?
आरसीबी आणि कोलकाता यांच्या आयपीएल स्पर्धेमध्ये एकूण 30 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये कोलकाता वरचढ ठरला आहे. कोलताताने 30 पैकी 16 सामने जिंकले तर, बंगळुरुला 14 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. दोन्ही संघानी सर्वाधिक 200 हून अधिक धावांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक ठरणार आहे.


कधी आणि कुठे होणार सामना?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स् (KKR) यांच्यातील सामना आज कोलकाता येथील ईडन गार्डन (Eden Gardens) मैदानावर रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार असून त्याआधी 7 वाजता नाणेफेक होईल.


लाईव्ह सामना कुठे पाहाल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' ॲपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.