KKR vs RCB IPL 2024: कोलकाताचा 6 बाद 222 धावांचा डोंगर, आरसीबीपुढं तगडं आव्हान

KKR vs RCB IPL 2024:

मुकेश चव्हाण Last Updated: 21 Apr 2024 07:45 PM
रोमांचक लढतीत केकेआरचा एका रननं विजय

कोलकाता नाईट रायडर्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला एका रननं पराभूत केलं आहे. आरसीबीचा संघ 20 ओव्हरमध्ये 221 धावा करु शकला.

आरसीबाला आठवा धक्का, दिनेश कार्तिक 25 धावांवर बाद

आरसीबाला आठवा धक्का बसला असून दिनेश कार्तिक 25 धावांवर बाद झाला आहे. 

आरसीबीला सातवा धक्का, प्रभुदेसाई बाद

 आरसीबीला सातवा धक्का बसला आहे. हर्षित राणानं प्रभुदेसाईला 24 धावांवर बाद केलं. 

आरसीबीला सहावा धक्का, लोम्रोर 4 धावांवर बाद

सुनील नरेननं आरसीबीला सहावा धक्का दिला आहे. लोम्रोर 4 धावा करुन बाद झाला आहे. 

बंगळुरुला पाचवा धक्का, कॅमरुन ग्रीन सहा धावांवर बाद

आरसीबीला कोलकातानं पाचवा धक्का दिला आहे. कॅमरुन ग्रीन सहा धावा करुन बाद झाला. 

आंद्रे रसेलचा बंगळुरुला दुसरा धक्का

आंद्रे रसेलनं एकाच ओव्हरमध्ये बंगळुरुला दुसरा धक्का दिला. रजत पाटीदार 52 धावांवर बाद झाला. 

बंगळुरुला तिसरा धक्का, विल जॅक्स 55 धावांवर बाद

बंगळुरुला तिसरा धक्का बसला असून आंद्रे रसेलनं विल जॅक्स 55 धावांवर बाद केलं.  

रजत पाटीदार आणि विल जॅक्सची अर्धशतकं

रजत पाटीदार आणि विल जॅक्स या दोघांनी अर्धशतकं करत बंगळुरुचा डाव सावरला आहे. बंगळुरुनं 11 व्या ओव्हरपर्यंत 2 बाद  137 धावा केल्या आहेत. 

आरसीबीचं जोरादर प्रत्युत्तर, 7 ओव्हरमध्ये 2 विकेटवर 78 धावा

222 धावांचा पाठलाग करताना आरसीबीनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आरसीबीनं 7 ओव्हरमध्ये 2 विकेटवर 78 धावा केल्या आहेत. 

कोलकाताचा 222 धावांचा डोंगर, आरसीबीपुढं मोठं आव्हान

कोलकाता नाईट रायडर्सनं आरसीबीपुढं 20 ओवरमध्ये 6 बाद 222 धावा केल्या आहेत. आरसीबीला विजयासाठी आवश्यक धावसंख्या गाठता येते का ते पाहावं लागेल. 

श्रेयस अय्यर बाद, कोलकाताला मोठा धक्का

श्रेयस अय्यर 50  धावा करुन बाद झाला आहे. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याची विकेट गेली. 

श्रेयस अय्यरचं अर्धशतक, कोलकाताचा डाव सावरला

कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं अर्धशतक करुन डाव सावरला आहे. 

कोलकाताला पाचवा धक्का, रिंकू सिंग 24 धावा करुन बाद

कोलकाताला पाचवा धक्ला बसला आहे. रिंकू सिंग 24 धावा करुन बाद झाला आहे. 

कोलकाताला चौथा धक्का, व्यंकटेश अय्यर 16 धावांवर बाद

कोलकाताला चौथा धक्का बसला आहे. व्यंकटेश अय्यर 16 धावांवर बाद झाला आहे.  

कोलकाताला तिसरा धक्का, पॉवरप्लेमध्ये 75 धावा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं कोलकाता नाईट रायडर्सला तिसरा धक्का दिला आहे. रघुवंशी तीन धावा करुन बाद झाला. पॉवरप्ले संपेपर्यंत केकेआरच्या तीन बाद 75 धावा झाल्या. 

कोलकाता नाईट रायडर्सला दुसरा धक्का, सुनील नरेन बाद

कोलकाता नाईट रायडर्सला दुसरा धक्का बसला आहे. सुनील नरेन 10 धावांवर बाद झाला आहे.

फिल सॉल्टची वादळी खेळी संपली, मोहम्मद सिराजनं घेतली विकेट

फिल सॉल्ट 48 धावांवर बाद, कोलकाताला पहिला धक्का 

आरसीबीची Playing XI:

फाफ डू प्लेसिस (c), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (w), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद सिराज

केकेआरची Playing XI:

फिलिप सॉल्ट (w), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (c), व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा

आरसीबीचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजाची निर्णय

आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. केकेआर थोड्याच वेळात फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.





केकेआरचा संघ सज्ज

सामन्याआधी नेमकं काय घडलं?

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांची सामन्याआधी भेट

केकेआरने मारली होती बाजी

आयपीएल 2024 च्या हंगामातील 10 वा सामना आरसीबी आणि केकेआरमध्ये खेळवला गेला होता. हा सामना बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी मैदानावर झाला होता. या सामन्यात केकेआरने विजय मिळवला होता. 

खेळपट्टी कशी असेल?

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात धावांचा पाऊस पडत आहे. आता 200 धावांचे लक्ष्य असतानाही येथील संघ सुरक्षित वाटत नाहीत. सनरायझर्स हैदराबादने या मोसमात आतापर्यंत तीनदा 250 धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशा परिस्थितीत जर आपण इडन गार्डन्सच्या खेळपट्टीबद्दल बोललो तर ही खेळपट्टी फलंदाजांसाठी नेहमीच उपयुक्त असते. ज्यामुळे उच्च धावसंख्येचा सामना होण्याची शक्यता असते. येथे खेळावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोलंदाजांना वैविध्यपूर्ण गोलंदाजीची नितांत गरज आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची संभाव्य Playing XI:

फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, विल जॅक, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत, महिपाल लोमरोर, अल्झारी जोसेफ, विजयकुमार विशाक, मोहम्मद सिराज.

कोलकाता नाइट रायडर्सची संभाव्य Playing XI:

फिल सॉल्ट, सुनील नरेन, अंगकृष्ण रघुवंशी, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर/नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

कोलकाता नाईट रायडर्सचा संपूर्ण संघ:

फिलिप सॉल्ट (w), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (c), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, वैभव अरोरा, सुयश शर्मा, मनीष पांडे, अनुकुल रॉय, रहमानउल्ला गुरबाज, अल्लाह गझनफर, साकिब हुसैन, शेरफान रदरफोर्ड, चेतन साकारिया, नितीश राणा, श्रीकर भारत, दुष्मंथा चमीरा

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संपूर्ण संघ:

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (c), विल जॅक्स, रजत पाटीदार, सौरव चौहान, दिनेश कार्तिक (w), महिपाल लोमरोर, अनुज रावत, विजयकुमार विषक, रीस टोपले, लॉकी फर्ग्युसन, यश दयाळ, यश दयाळ , स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, ग्लेन मॅक्सवेल, आकाश दीप, राजन कुमार, टॉम करन, मयंक डागर, अल्झारी जोसेफ, कॅमेरॉन ग्रीन, मनोज भंडागे, हिमांशू शर्मा

चेन्नईला धक्का, मुंबईला फायदा, दिल्लीचा पराभव करत हैदराबाद थेट दुसऱ्या स्थानी

पार्श्वभूमी

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru IPL 2024: आज कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात सामना होणार आहे. कोलकातामधील इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार दुपारी 3.30 वाजता हा सामना सुरु होईल. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाताचा संघ तिसऱ्या क्रमांकावर असून बंगळुरुचा संघ दहाव्या स्थानावर आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.