खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
नंदूरबार जिल्ह्यातील तळोद्याहून धनपूर गावाकडे जाणाऱ्या एसटी बसचा तळोदा शहरापासून काही अंतरावर अपघात झाल्याची दु्र्दैवी घटना घडली.
Continues below advertisement
Nandurbar bus accident passenger injured
Continues below advertisement
1/7
नंदूरबार जिल्ह्यातील तळोद्याहून धनपूर गावाकडे जाणाऱ्या एसटी बसचा तळोदा शहरापासून काही अंतरावर अपघात झाल्याची दु्र्दैवी घटना घडली.
2/7
तळोदाजवळील रांजणी फाट्याजवळ ही बस पलटली, या दुर्घटनेत बसमध्ये असलेले 30 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
3/7
या अपघातात काही शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती असून सुदैवाने जीवितहानी टळली. जखमींना उपचारासाठी तत्काळ प्रतापूर प्राथमिक आरोग्य दाखल करण्यात आलं आहे.
4/7
बसचालकाने खड्डे वाचवण्याचा नादात बसवरील नियंत्रण गमावले आणि बसचा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केल्याचं पाहायला मिळालं
5/7
या दुर्घटनेनंतर प्रतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली असून आपल्या जखमी नातेवाईकांवर उपचार होण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचे दिसून आले.
Continues below advertisement
6/7
दरम्यान, या अपघाताची माहिती स्थानिक आरोग्य प्रशासनालाही देण्यात आली असून घटनास्थळी रुग्णावाहिका पाठवून जखमींना रुग्णालयात नेण्या आले
7/7
स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी पुढाकार घेतला, तर पोलीस प्रशासानानेही दखल घेत घटनास्थळी धाव घेतली होती.
Published at : 25 Nov 2024 09:56 PM (IST)