KKR vs PBKS Match Prediction : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मधील 53 वा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात पाहायला मिळणार आहे. कोलकाताच्या घरच्या मैदानावर आज 8 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. मागील सामन्यात पंजाब किंग्सला मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात हैदराबादवर विजय मिळवला आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना आगामी सामने जिंकणं गरजेचं आहे.     


KKR vs PBKS, IPL 2023 Match 53 : कोलकाता विरुद्ध पंजाब


कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आयपीएल 2023 आतापर्यंत खेळलेल्या दहा सामन्यांपैकी चार सामन्यांत विजय मिळवून गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी कोलकाताला उर्वरित सामने जिंकणे आवश्यक आहे. मागील सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर पाच धावांनी विजय मिळवला.


पंजाब किंग्सने (PBKS) आतापर्यंतच्या दहापैकी पाच सामने जिंकले आहेत. सध्या पंजाब संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मागील सामन्यात पंजाबला पराभव पत्करावा लागला. आगामी सामने जिंकल्यास पंजाबला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. त्यामुळे दोन्ही संघांमधील आजचा सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे.


KKR vs PBKS Head to Head : पंजाब विरुद्ध कोलकाता हेड टू हेड आकडेवारी


इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) संघ एकूण 31 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये कोलकाता संघ वरचढ ठरला आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाने 20 सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्स संघाला 11 सामने जिंकता आले आहेत. आयपीएल 2023 मध्येही हे दोन संघ आमने-सामने आले होते. या सामन्यात पंजाबने कोलकाताचा 7 धावांनी पराभव केला. पराभवाचा वचपा काढण्याची संधी आज कोलकाता संघाला मिळणार आहे.


IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


कोलकाता (KKR) आणि पंजाब (PBKS) यांच्यात आज 8 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 Points Table : थरारक सामन्यात हैदराबादचा विजय, सर्व संघांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी; पाहा पॉईंट्स टेबलची स्थिती