IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 चा 52 वा सामना राजस्थान रॉयल्स (RR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. या रोमहर्षक सामन्यात हैदराबादने चार विकेट्सने विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानने हैदराबादला 215 धावांचं लक्ष्य दिलं होतं, पण हैदराबादने शेवटच्या चेंडूवर अब्दुस समदच्या षटकारासह विजय मिळवला. यानंतर गुणतालिकेत बदल झाला आहे.
राजस्थान विरुद्ध हैदराबाद सामन्यापूर्वी राजस्थान गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर होता, मात्र या पराभवानंतरही ते चौथ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, हैदराबादमधील स्थितीत किंचित सुधारणा झाली आहे. संघ आधी शेवटच्या स्थानावर होता, पण आता नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. रविवारी झालेल्या पहिल्या डबल हेडर सामन्यात गुजरातने लखनौचा पराभव केला आणि गुणतालिकेत पहिलं स्थान कायम राखलं आहे. लखनौच्या पराभवाचा चेन्नईला फायदा झाला आहे. चेन्नई संघ गुणतालिकेत लखनौला मागे टाकत पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
आयपीएल गुणतालिकेत गुजरात टायटन्स पहिल्या स्थानावर कायम आहे. गुजरातने आतापर्यंतचा 11 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले असून संघाकडे 13 गुण आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चेन्नई संघाकडे 13 गुण आहेत. चेन्नईने 11 सामन्यांपैकी सहा सामन्यांत विजय मिळवला आहे. तिसऱ्या क्रमांकावर लखनौ संघ आहे. लखनौकडे 11 गुण असून संघाने 11 पैकी पाच सामने जिंकले आहेत. 10 गुणांसाह राजस्थान चौथ्या क्रमांकावर कायम आहे. राजस्थानने 11 सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत.
मागील सामन्यात पराभवानंतर बंगळुरु आणि मुंबईला आयपीएल गुणतालिकेत टॉप 4 मध्ये स्थान मिळवता आलेलं नाही. बंगळुरु (RCB) संघ पाचव्या तर मुंबई इंडियन्स सहाव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघाकडे प्रत्येकी दहा-दहा गुण आहेत. गुजरात आणि चेन्नईचं प्लेऑफमधील स्थान जवळजवळ निश्चित झालं आहे. असं असलं तरी सर्व संघांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. त्यासाठी संघांना आगामी सामने जिंकावे लागतील.
गुणतालिकेत पंजाब किंग्स (PBKS) सातव्या क्रमांकावर आहे. तर कोलकाता नाईट राईडर्स (KKR) आठव्या क्रमांकावर आहे. राजस्थानचा पराभव केल्यावर हैदराबाद एक स्थान पुढे सरकला आहे. सनरायजर्स हैदराबाद संघ आठ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. त्याआधी नवव्या स्थानावर असलेल्या दिल्ली संघाला झटका बसला असून दिल्ली पुन्हा एकदा शेवटच्या दहाव्या स्थानावर घसरला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
12 चेंडूत 41 धावा..., श्वास रोखायला लावणारा सामना, अखेरच्या 2 षटकातील थरार जसाच्या तसा