KKR vs LSG, IPL 2023 : निकोलस पूरनच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर लखनौने निर्धारित 20 षठकात आठ विकेटच्या मोबदल्यात 176 धावांपर्यंत मजल मारली. निकोलस पूरनचा अपवाद वगळता इतर एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. कोलकात्याकडून सुनील नारायण याने भेदक मारा केला. नारायण याने दोन विकेट घेतल्या. कोलकात्याला विजयासाठी 177 धावांचे आव्हान आहे.


नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना लखनौची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामी फलंदाज करण शर्मा तीन धावांवर तंबूत परतला. हर्षित राणा याने लखनौला पहिला धक्का दिला. क्विंटन डिकॉक आणि प्रेरक राणा यांनी कोलकात्याच्या डावाला आकार दिला. दोघांनी संयमी फलंदाजी करत धावसंख्या हालती ठेवली.  दुसऱ्या विकेटसाठी 25 चेंडूत 41 धावांची भागिदारी केली. प्रेरक मांकड याने 20 चेंडूत 26 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार लगावले. प्रेरक मांकड बाद झाल्यानंतर स्टॉयनिसही तंबूत परतला. स्टॉयनिस याला खातेही उघडता आले नाही. वैभव अरोरा याने या दोघांना लागोपाठ तंबूत पाठवले.  कर्णधार कृणाल पांड्याही लगेच तंबूत परतला. कृणाल पांड्या याला फक्त 9 धावांची खेळी करता आली. यामध्ये त्याने एक षटकार लगावला. एका बाजूने जम बसेलला क्विंटन डि कॉक यानेही आपली विकेट फेकली. डि कॉक याने 27 चेंडूत 28 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने दोन षटकार लगावले. 






73 धावांमध्ये लखनौचा अर्धा संघ तंबूत परतला होता. लखनौची फलंदाजी ढेपाळली असे वाटले... पण निकोलस पूरन आणि आयुष बडोनी यांनी लखनौचा डाव सावरला. दोघांनी वादळी फलंदाजी करत लखनौची धावसंख्या वाढवली. निकोलस पूरन याने अर्धशतक झळकावले.. तर आयुष बडोनी याने 25 धावांची छोटेखानी खेळी केली. आयुष बडोनी आणि निकोलस पूरन यांनी अर्दशतकी भागिदारी केली. या दोघांच्या फलंदाजीमुळेच लखनौची धावसंख्या 176 पर्यंत पोहचली. 






निकोलस पूरन याने 30 चेंडूत 58 धावांची खेली केली. या खेळीमध्ये त्याने पाच षटकार आणि चार चौकार लगावले. निकोलस पूरन याच्या फटकेबाजीपुढे कोलकात्याची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. आयुष बडोनी याने एक षटकार आणि दोन चौकाराच्या मदतीने 25 धावांचे योगदान दिले. अखेरीस कृष्णप्पा गौतम याने 4 चेंडूत 11 धावांचे योगदान दिले. 


कोकात्याकडजून वैभव आरोरा, शार्दुल ठाकूर आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.