DC vs CSK, Kotla stadium Delhi : एमएस धोनी याचे जगभरात चाहते आहे. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते जिवाचे रान करतात... हे अनेकदा पाहायलाही मिळाले. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात तर चेन्नईच्या प्रत्येक सामन्यात धोनी धोनी असा गजर ऐकायला मिळत होता. धोनीची एक झलक पाहण्यासाठी स्टेडिअम हाऊसफूल झाली होती. 41 वर्षीय धोनी आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतोय.. आज चेन्नईचा अखेरचा साखळी सामना दिल्लीत होता. या सामन्यासाठी धोनी दिल्लीत आला होता. धोनीला पाहण्यासाठी स्टेडिअमवर तुफान गर्दी झालीच होती. पण चाहत्यांनी चक्क धोनीच्या बसला गराडा घातला होता...
राजकोट मैदानावर सामना खेळण्यासाठी धोनी बसमधून निघाला होता. चेन्नईचा संपूर्ण संघ होता.. त्यावेळी अचानक चेन्नईच्या बसला चाहत्यांनी गरडा घातला. धोनी धोनीच्या घोषणा ऐकायला मिळाले. धोनीसाठी दिल्लीकर रस्त्यावर उतरले होते. ट्रफिक जॅम झाले होते... रस्त्यावर जिकडे तिके पिवळी जर्सी दिसत होती. प्रत्येक चाहत्याने धोनीच्या सात क्रमांकाची जर्सी घातली होती.
धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र यामुळे दिल्लीच्या रस्त्यावर तुफान ट्रॅफिक जाम झाले.
पाहा व्हिडीओ...
यंदाच्या हंगामात धोनीचा सामना पाहण्यासाठी प्रत्येक ठिकाणी गर्दी झाली. कोलकाता, राजस्तान, बेंगलोर अथवा मुंबई कुठेही सामना असो... प्रतिस्पर्धी संघापेक्षा चेन्नईला सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांची संख्या दिसली.. मुंबईतील सामन्यावेळी अर्धे वानखेडे पिवळ्या रंगात होते... कोलकात्यातही तशीच अवस्था होती. रविंद्र जाडेजाने तर एका सामन्यानंतर सांगितले की... मी फलंदाजीला असताना बाद व्हावे, अशी चाहत्यांची इच्छा असते.. कारण धोनीला फलंदाजी करताना पाहायचे असते.. धोनीची क्रेज आजही कायम आहे. यंदाच्या हंगामात धोनीने चाहत्यांना निराश केले नाही. धोनीने षटकारांचा पाऊस पाडत आजही आपण लयीत असल्याचे दाखवून दिले.
Rajasthan Royals ची सुरुवात दणक्यात, मग चुकले काय? रॉयल्स कुठे कमी पडले