KKR vs LSG, IPL 2023 : ईडन गार्डन्स मैदानावर नाणेफकीचा कौल कोलकात्याच्या बाजूने आहे. नीतीश राणा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पाहुण्या लखनौला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आमंत्रित केलेय. लखनौसाठी आजचा सामना निर्णायक आहे. नीतीश राणे याने विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. विजय मिळवून स्पर्धेचा शेवट गोड करण्यावर भर असेल, असे राणाने सांगितलेय.
लखनौचा कर्णधार कृणाल पांड्या म्हणाला की, संघामध्ये दोन महत्वाचे बदल करण्यात आलेत. कृष्णप्पा गौतम याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय.
कोलकाता नाइट रायडर्सची प्लेईंग इलेव्हन : रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, वेंकटेश अय्यर, नीतीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शार्दुल ठाकुर, सुनील नारायण, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
लखनौ सुपर जायंट्सची प्लेईंग इलेव्हन : : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), करण शर्मा, प्रेरक मांकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पांड्या (कर्णधार), आयुष बडोनी, कृष्णप्पा गौतम, रवि बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान
KKR vs LSG Match Preview : कोलकाता विरुद्ध लखनौ
लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघ सातव्या क्रमांकावर आहे. लखनौ संघाने (Lucknow Super Giants) यंदाच्या हंगामात खेळलेल्या 13 सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच कोलकाता (Punjab Kings) संघाने आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पण संघाचा नेट रनरेट खूप कमी असल्यामुळे संघ गुणतालिकेत खाली आहे.
KKR vs LSG Head to Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघामध्ये दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये लखनौ संघाचं पारड जड आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने दोन्ही सामन्यांमध्ये कोलकाताचा पराभव केला आहे. केकेआर संघाला मात्र लखनौ विरोधात एकही सामना जिंकता आलेला नाही.
IPL 2023 : दिल्लीचा शेवट पराभवाने, चेन्नईचा 77 धावांनी विराट विजय
CSK : धोनीसाठी दिल्लीकर रस्त्यावर, माहीच्या बसला चाहत्यांचा गराडा, व्हिडीओ पाहाच