IPL 2023, KKR vs GT : गुरबाजच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर कोलकात्याने निर्धारित 20 षटकात सात विकेटच्या मोबद्लयात 179 धावांपर्यंत मजल मारली. गुरबाज याने 39 चेंडूत 81 धवांची विस्फोटक खेळी केली. गुरबाजचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. आंद्रे रसेल याने अखेरचीस 34 धावांचे योगदान दिले. गुजरातकडून मोहम्मद शमी याने तीन विकेट घेतल्या. गुजरातला विजयसाठी 180 धावांचे आव्हान देण्यात आले आहे.
प्रथम फंलदाजी करताना कोलकात्याची सुरुवात निराशाजनक झाली. नारायण जगदीशन पुन्हा एकदा फेल गदेला. जगदीशन याला फक्त 19 धावांचे योगदान देता आले. पुनरागमन करणाऱ्या शार्दूल ठाकूर यालाही मोठी खेळी करता आली नाही. ठाकूर खातेही न उघडता बाद झाला. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला गुरबाज याची फटकेबाजी सुरुच होती. वेंकटेश अय्यर यालाही इम्पॅक्ट पाडता आला नाही. अय्यर अवघ्या 11 धावा काढून बाद झाला. त्याच्यापाठोपाठ नीतीश राणाही चार धावा काढून बाद झाला. रिंकू सिंह आज मोठी खेळी कऱण्यात अपयश आले. रिंकू 20 चेंडूत 19 धावा काढून बाद झाला. अखेरच्या षटकात आंद्रे रसेल याने फटकेबाजी केली. त्याने 19 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने 3 षटकार आणि दोन चौकार लगावले.
गुरबाज याने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक रुप धारण केले होते. गुरबाज याने अवघ्या 39 चेंडूत 81 धावांची खेळी केली. या खेळीत गुरबाज याने सात खणखणीत षटकार लगावले. त्याशिवाय पाच चौकारांचा पाऊसही पाडला. गुरजाब याच्या फंलदाजीमुळेच कोलकाता संघाने सन्मानजनक धावसंख्या उभारु शकला. गुरबाज याने जगदीशनसोबत 23, शार्दूल ठाकूरसोबत 24. अय्यरसोबत 37, रिंकूसोबत 47 धावांची भागिदारी केली.
गुजरातकडून राशिद खान याने सर्वात महागडी गोलंदाजी केली. राशिद खान याचा 100 वा आयपीएल सामना आहे. हा सामन्यात राशिद याच्या पिटाई झाली. राशिद याच्या चार षटकात कोलकात्याने 54 धावा वसूल केल्या. राशिदला एकही विकेट मिळाली नाही. मोहम्मद शमी याने चार षटकात 33 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय जोश लिटिल याने चार षटकात 25 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. नूर अहमद यानेही अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. नूर याने 4 षटकात 21 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या आणि मोहित शर्मा याांन एकाही विकेट मिळाली नाही.