WTC 2023 : इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल रंगणार आहे. निवड समितीने रोहित शर्माच्या नेतृत्वातील 15 जणांच्या संघाची निवड केली आहे. आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी संभावित 11 भारतीय खेळाडूंची निवड केली आहे.  रोहित शर्माच्या संघात दर्जेदार वेगवान गोलंदाज, वर्ल्ड क्लास फिरकी गोलंदाजांचा भरणार आहे. त्याशिवाय आघाडीचे फलंदाजही आहेत. आयसीसीने केएल राहुल याला अंतिम 11 मध्ये संधी दिलेली नाही. पाहूयात आयसीसीने निवडलेल्या संभावित 11 खेळाडूंमध्ये कोण कोण आहेत...


रोहित शर्मा (कर्णधार) 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड या ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याला रोहित शर्मा तोंड देईल. रोहित शर्मा टीम इंडियासाठी सलामीला उतरले. टीम इंडिया जेव्हा इंग्लंड दौऱ्यावर गेली होती, तेव्हा रोहित शर्माने धावांचा पाऊस पाडला होता. 2021-2022 मध्ये रोहित शर्माने इंग्लंडमध्ये 53 च्या सरासरीने चार कसोटी सामन्यात 368 धावा केल्या होत्या.  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये रोहित शर्माने 700 धावा केल्या आहेत. 


शुभमन गिल -


रोहित शर्मासोबत सलामीला शुभमन गिल येईल. केएल राहुल भारताचा पर्यायी सलामी फलंदाज असेल. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी मागील काही सामन्यात टीम इंडियासाठी दमदार सलामी दिली आहे. गिल याने 15 कसोटीमध्ये दोन शतकासह 890 धावा केल्या आहेत. मागील इंग्लंड दौऱ्यात गिल याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. गिल याा दोन कसोटीत 57 धावा काढता आल्या. गिल इंग्लंडमधील हा खराब रेकॉर्ड मोडण्यासाठी मैदानात उतरेल.


चेतेश्वर पुजारा - 


दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर टीम इंडियातून चेतेश्वर पुजाराला वगळले होते. त्यानंतर पुजाराने टीम इंडियात कमबॅक केले.  त्यानंतर पुजाराने धावांचा पाऊस पाडलाय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपमध्ये पुजाराने 16 कसोटी सामन्यात 887 धावा चोपल्यात. इंग्लंडमध्येही पुजाराला खेळण्याचा अनुभव आहे. इंग्लंडमध्ये पुजाराने 15 कसोटी सामन्यात 829 धावा केल्या आहेत. 


विराट कोहली - 


भारताची माजी कर्णधार विराट कोहली फॉर्मात परतलाय. ऑस्ट्रे्लियाविरोधात सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाडायला मैदानात उतरेल. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील अहमदाबाद कसोटीत विराट कोहलीने शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला सावध राहण्याचा सल्ला दिला होता. ऑस्ट्रेलियाविरोधात विराट कोहलीची बॅट नेहमीच धावांचा पाऊस पाडते. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरोधात आतापर्यंत 24 कसोटी सामन्यात 1979 धावा चोपल्या आहेत. यामध्ये त्याने आठ शतके लगावली आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये विराट कोहलीने  16 कसोटीत 869 धावा केल्या आहेत. 


अजिंक्य रहाणे - 


अजिंक्य रहाणे याने 15 महिन्यानंतर टीम इंडियात कमबॅक केलेय. जानेवारी 2022 मध्ये त्याने अखेरचा सामना केळला होता. त्यानंतर खराब फॉर्ममुळे त्याला टीम इंडियातून डच्चू मिळाला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये रहाणे याने धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर त्याचे टीम इंडियात कमबॅक झालेय.  वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपमध्ये त्याने पाच सामन्यात 209 धावा केल्या आहेत. अय्यर दुखापतग्रस्त झाल्यामुळे अजिंक्य रहाणे याची टीम इंडियात वर्णी लागली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात टीम इंडियात खेळण्यासाठी रहाणे याला राहुलशी स्पर्धा करावी लागणार आहे. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीचा रहाणेला अनुभव आहे. त्याशिवाय इंग्लंडमध्ये रहाणे याने धावांचा पाऊस पाडलाय. त्यामुळे रहाणेला अंतिम 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.


रविंद्र जाडेजा - 


रविंद्र जाडेजा भारताचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहे. तो कोणत्याही क्रमांकावर फंलदाजी करु शकतो. त्याशिवाय गोलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये मोठे योगदान देऊ शकतो.  जाडेजा टीम इंडियासाठी एक्स फॅक्टर ठरु शकतो. रविंद्र जाडेजा भारतीय संघातील एकमेव लेफ्टी फलंदाज आहे. अनुभवी जाडेजाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये 673 धावा आणि 43 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. जाडेजा अनुभव टीम इंडियासाठी फायद्याचा ठरू शकतो. 
 


के एस भरत (विकेटकीपर) 


ऋषभ पंत याचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर तो उपचार घेत आहे. पंतच्या अनुपस्थितीत केएस भरत याला टीम इंडियात स्थान देण्यात आले आहे.  भरत याला फलंदाजीत अद्याप योगदान देता आलेले नाही. भरत याला केएल राहुल याच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे. राहुल आणि भरत या दोन्हीपैकी एकाला विकेटकीपर म्हणून प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. राहुल टीम इंडियाच्या एकदिवसीय संघात विकेटकिपरची भूमिका बजावतो. त्यामुळे पंतच्या अनुपस्थितीत राहुल विकेटकीपर म्हणून खेळू शकतो. फलंदाजीतील कौशल्यामुळे राहुल याला टीम इंडियात स्थान मिळू शकते. पण टीम इंडिया अशी रिस्क घेण्याची शक्यता कमीच आहे. पार्ट टाईम विकेटकीपर ऐवजी  केएस भरत याला संधी मिळण्याची शक्यता आहे. भरत याने चार कसोटी सामन्यात 101 धावा केल्या आहेत. तसेच आठ जणांना विकेटमागे बाद केलेय. 


शार्दुल ठाकूर - 


इंग्लंडमधील खेळपट्टी पाहात अश्विनऐवजी शार्दुल ठाकूर याला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.  टीम इंडिया चार वेगवान गोलंदाजासह मैगदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शार्दुल ठाकूर याला प्लेईंग 11 मध्ये संधी दिली जाऊ शकते. अश्विन याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. शार्दूल ठाकूर याने इंग्लंडमध्ये तीन कसोटी सामन्यात आठ विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय फलंदाजीत दोन अर्धशतके झळकावली आहेत. इंग्लंडमधील खेळपट्टीचा शार्दुल ठाकूर याला अनुभव आहे. 
 
मोहम्मद शामी - 


जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह टीम इंडियाची वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल. शमीला इंग्लंडमध्ये खेळण्याचा तगडा अनुभवही आहे. शमी याने 13 कसोटी सामन्यात 38 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपच्या 12 कसोटी सामन्यात 41 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय तळाला फलंदाजी करण्याचे कौशल्यही आहे. 


मोहम्मद सिराज - 


शमीसोबत नवीन चेंडू हाताळण्याची जबाबदारी मोहम्मद सिराज याच्यावर असेल. गेल्या काही दिवसांपासून सिराज याने भेदक गोलंदाजी केली आहे.   इग्लंडमध्ये सिराजने पाच सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपच्या 13 कसोटी सामन्यात 31 विकेट घेतल्या आहेत. 


उमेश यादव 


उमेश यादव अथवा जयदेव उनाडकट यापैकी एकाला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. अनुभवामुळे उमेश यादव याचे पारडे जड मानले जातेय. उमेश यादव याने इंग्लंडमध्ये दोन कसोटी सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपमध्ये त्याच्या नावावर 20 विकेट आहेत.
 
संभावित प्लेईंग 11


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा, केएस भरत, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव