Shakib Al Hasan IPL 2023 : आयपीएलच्या सुरुवातीलाच कोलकाता संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू संपूर्ण आयपीएलला उपलब्ध नसणार आहे. शाकिब अल हसन याने कोलकाताला याबातची माहिती दिली आहे. याआधीच नियमीत कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएलला मुकला आहे. त्यात आता आणखी एक स्टार खेळाडू आयपीएलबाहेर गेलाय. हा कोलकात्यासाठी मोठा धक्का आहे. 


शाकिब अल हसन सध्या तुफान फॉर्मात आहे. मायदेशात झालेल्या मालिकेत त्याने दमदार कामगिरी केली आहे. शाकिब अल हसन याने आयपीएलच्या 16 व्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. शाकिब अल हसन याने कोलकाता संघाला याबाबतची माहिती दिली आहे. शाकिब हल हसन याने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे कोलकात्याला मोठा धक्का बसला आहे. 


आतंरराष्ट्रीय क्रिकेट आणि वयक्तिक कारणामुळे शाकिब हल हसन याने आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. शाकिब अल हसन याला कोलकाता संघाने दीड कोटी रुपयात आपल्या ताफ्यात घेतला होता. लिलावात शाकिबवर इतर संघाने बोली लावली नव्हती. शाकिबला कोलकाता संघाने मूळ किंमतीमध्ये संघात घेतले होते. 






कोलकात्याचा पराभव -
आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात पंजाबने कोलकात्याचा सात धावांनी पराभव केला आहे. डकवर्थ लुईस नियमांनुसार पंजाबने कोलकतात्याचा सात धावांनी पराभव केला. पंजाबने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघ सन्मानजक धावसंख्यापर्यंत पोहचला होता. पण चार षटके बाकी असताना पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळेच डकवर्थ लुईस नियमांनुसार पंजाबला सात धावांनी विजय देण्यात आले. भानुका राजपक्षे आणि अर्शदीप सिंह पंजाबच्या विजयाचे शिल्पकार ठरले. भानुका राजपक्षे याने अर्धशतक झळकावले तर गोलंदाजीत अर्शदीपने तीन विकेट घेतल्या. 


श्रेयस अय्यर बाहेर, राणाकडे संघाची धुरा -


इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या आगामी हंगामासाठी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाने नितीश राणा (nitish rana) याला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.  संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी दोन ते तीन महिने लागणार असल्याने तो आयपीएलला मुकणार आहे. नितीश राणा 2018 पासून केकेआरशी जोडला गेलेला आहेत.


आणखी वाचा :
IPL : चेन्नई, गुजरात, दिल्ली अन् पंजाबची ताकद वाढणार, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारतात दाखल