Bhojpuri commentators for IPL 2023 : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक संघाचा एक एक सामना आतापर्यंत झालाय. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत.  इम्पॅक्ट प्लेअर, वाईड-नो बॉलवर DRS यासह यंदाच्या आयपीएलमध्ये बरेच नवे पाहायला मिळतेय. यंदाच्या आयपीएलमधीव भोजपुरी कॉमेंट्री चर्चेचा विषय ठरत आहे. आयपीएलची कॉमेंट्री 12 प्रदेशिक भाषामध्ये होते आहे. यामध्ये मराठी, तेलगू, भोजपुरीसह इतर भाषांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा भोजपुरी कॉमेंट्रीची सुरु आहे. अभिनेता रवी किशनच्या स्वॅगमुळे भोजपुरी कॉमेंट्री सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 


रवी किशन याने अस्सल भोजपुरी स्वॅग धरत आयपीएलची कॉमेंट्री केली. चेन्नई आणि गुजरात यांच्यात झालेल्या सामन्यावेळी भोजपुरी कॉमेंट्री चर्चेचा विषय होती. ज्यांना भोजपुरी भाषा समजत नाही, अशा चाहत्यांनीही याचा आनंद घेतला. अनेकांनी ट्वीटवर व्हिडीओ पोस्ट करत रवी किशनचे कौतुक केले.  "ई का हो, मुंह फोड़बा का...? पासून  जिय जवान जिय.. लहि गईल-लहि गईल" यासारखे शब्द कानावर ऐकायला मिळत होते. रवी किशन याची कॉमेंट्री शैली अनेकांना भावली. 










































 
भोजपुरीमध्ये कॉमेंट्री केल्यानंतर रवी किशन याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यामध्ये तो सर्व चाहत्यांना धन्यवाद म्हणतोय. त्याशिवाय भोजपुरी भाषेत कॉमेंट्री सुरु करण्याचा निर्णय घेणाऱ्याचेही आभार व्यक्त केले आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रवी किशन म्हणतो...  "जिंदगी झंड बा, और पहली बार हुए #iplbhojpuri का घमांड बा !!!!