Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) मेंटर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाच्या यशावर अधिक लक्ष केंद्रित केले. एवढेच नाही तर या आयपीएलमधील खराब फॉर्ममुळे मिचेल स्टार्कला वाईट गोलंदाज म्हणता येणार नाही, असं म्हणत त्याची बाजूही घेतली आहे.


ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला केकेआरने 24 कोटी 75 लाख रुपयांना विकत घेतले, ज्याने आतापर्यंत 77 च्या सरासरीने फक्त दोन विकेट घेतल्या आहेत आणि चारही सामन्यांमध्ये 11 पेक्षा जास्त सरासरीने धावा दिल्या आहेत. गंभीरने त्याचा बचाव करत म्हटले की, 'खराब आकड्यांनी काही फरक पडत नाहीत. टी-20 क्रिकेटमध्ये गोलंदाजांची नेहमी अशीच अवस्था होते. तसेचआम्ही चारपैकी तीन सामने जिंकले आहेत.


गौतम गंभीर पुढे म्हणाला, सांघिक खेळात जिंकणे महत्त्वाचे असते. आम्ही चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. मी कोणाच्या कामगिरीवर आनंदी का होणार नाही? खेळात चांगले-वाईट दिवस येतात. पण संघाचा विजय महत्त्वाचा असतो, असं गौतम गंभीरने सांगितले. पहिल्या चार सामन्यांत चांगले निकाल मिळाले. स्टार्क काय करू शकतो हे आम्हाला माहीत आहे, असं म्हणत गंभीर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं. चार सामन्यांमुळे तो वाईट गोलंदाज किंवा चांगला गोलंदाज बनत नाही. तो काय करू शकतो हे आम्हाला माहीत आहे. वैयक्तिक कामगिरीबद्दल बोलण्याचे कारण नाही. मला विश्वास आहे की स्टार्क चांगला खेळला आहे. तो लवकरच प्रभाव पाडेल कारण त्यासाठीच त्याची निवड करण्यात आली आहे, असा विश्वास देखील गौतम गंभीरने व्यक्त केला आहे.


मिचेल स्टार्कची आंतरराष्ट्रीय कारकीर्द


34 वर्षीय मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियाकडून 89 कसोटी, 121 एकदिवसीय आणि 60 टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 358, एकदिवसीय सामन्यात 236 आणि टी-20मध्ये 74 बळी आहेत. मिचेल स्टार्कने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 31 सामन्यांमध्ये 36 विकेट घेतल्या आहेत.


आज केकेआर आणि लखनौचा सामना-


आज कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना रंगणार आहे. इडन गार्डन मैदानावर दोन्ही संघ भिडणार आहे. भारतीय वेळेनूसार दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. आतापर्यंत कोलकाता आणि लखनौ हे दोन्ही संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसले आहेत. मात्र, केकेआरचा फॉर्म लखनौपेक्षा चांगला राहिला आहे. 


संबंधित बातम्या:


IPL 2024: नाव मोठं, लक्षण खोटं, महागड्या खेळाडूंनी वाट लावली, 17 कोटीच्या खेळाडूने तर लाज काढली!


उर्वशी रौतेला ऋषत पंतला नव्हे, तर फुटबॉलपटूला करतेय डेट?; फोटोवरील 'कॅप्शन'ने लक्ष वेधलं!


फोटो नव्हे तर हा भावनिक क्षण! धोनीने 2011च्या विश्वचषक ट्रॉफीला स्पर्श करताच भारतीय आठवणीत रमले