PIPL 2024 Latest Points Table: पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल 2024 च्या हंगामातील 27 वा सामना खेळला गेला. पंजाब किंग्सला आठ गड्यांच्या मोबदल्यात 147 धावांवर रोखल्यानंतर राजस्थान रॉयल्सने 19.5 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 152 धावा करत विजय मिळवला. पंजाबविरुद्धच्या विजयानंतर राजस्थानने आयपीएलच्या गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. प्ले ऑफमधील जागा पक्की करण्यासाठी किमान 16 व कमाल 20 गुण पुरेसे आहेत. राजस्थानचा प्ले ऑफमधील प्रवेश जवळपास पक्का झाला आहे.


गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानावर कायम आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वीही राजस्थान गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. आता पंजाबला पराभूत केल्यानंतर राजस्थानचे 10 गुण झाले आहेत, जे आतापर्यंतच्या स्पर्धेतील सर्वाधिक आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, ज्यात 5 जिंकले आहेत. सामना गमावलेला पंजाब किंग्स आठव्या स्थानावर आला आहे. पंजाबनेही 6 सामने खेळले आहेत, मात्र त्यांना फक्त 2 जिंकता आले आहेत.


अव्वल 4 संघ कोणते?


राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानावर आहे. यानंतर कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कोलकाताचा नेट रनरेट +1.528 आहे, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईचा +0.666 आणि चौथ्या क्रमांकावरील लखनौचा +0.436 आहे.


इतर संघांची काय अवस्था?


इतर संघांवर नजर टाकल्यास सनराजर्स हैदराबाद पाचव्या क्रमांकावर आणि गुजरात टायटन्स सहाव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांचे 6-6 गुण आहेत. हैदराबादने 5 पैकी 3 विजय नोंदवले आहेत, तर गुजरातने 6 पैकी 3 विजय मिळवले आहेत. त्यानंतर मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स 4-4 गुणांसह अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. निव्वळ धावगतीमुळे तिन्ही संघांच्या स्थानांमध्ये तफावत आहे. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एका विजयासह गुणतालिकेत तळाच्या 10व्या स्थानावर आहे.






6 चेंडूंनी पंजाबचा विजय केला निश्चित-


19व्या षटकातील शेवटच्या चार चेंडूंवर सॅम कुरनने दोन विकेट्स घेत फक्त दोन धावा दिल्या. यानंतर राजस्थानला शेवटच्या षटकांत 10 धावा करायच्या असताना अर्शदीप सिंगने पहिल्या दोन चेंडूत एकही धाव दिली नाही. आता राजस्थानला विजयासाठी शेवटच्या चार चेंडूत 10 धावांची गरज होती. ट्रेंट बोल्ट शिमरॉन हेटमायरसह क्रीजवर होता. अशा स्थितीत तिसऱ्या चेंडूवर एक धावा आली असती किंवा तोही डॉट झाला असता, तर पंजाबने जवळपास सामना जिंकला असता, पण हेटमायरने तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला आणि सामना पूर्णपणे राजस्थानच्या बाजूने गेला. केवळ हेटमायरची विकेट पंजाबला विजय मिळवून देऊ शकली असता. मात्र पुढच्या चेंडूवर दोन धावा आणि त्यानंतर हेटमायरने षटकार ठोकून आपल्या संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.


संबंधित बातम्या:


फोटो नव्हे तर हा भावनिक क्षण! धोनीने 2011च्या विश्वचषक ट्रॉफीला स्पर्श करताच भारतीय आठवणीत रमले


14 चेंडूत 30, मग 4 चेंडूत 10 धावांची गरज; पंजाबचा विजय अन् राजस्थानचा पराभव पक्का झालेला, मग...


IPL 2024: नाव मोठं, लक्षण खोटं, महागड्या खेळाडूंनी वाट लावली, 17 कोटीच्या खेळाडूने तर लाज काढली!