IPL 2024 KKR vs LSG: आयपीएल 2024 च्या 28 व्या सामन्यात, कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्सचे संघ आमनेसामने असतील. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर दुपारी 3.30 वाजता खेळवला जाईल. या सामन्यातून दोन्ही संघांना मोसमातील चौथा विजय मिळवायचा आहे. केकेआरने आतापर्यंत 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर लखनौला 5 पैकी 3 सामने जिंकता आले आहेत.
चांगल्या नेट रन रेटमुळे पॉइंट टेबलमध्ये केकेआर दुसऱ्या स्थानावर आहे, तर लखनौ चौथ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत आजचा सामना जिंकून लखनौचा संघ दुसऱ्या क्रमांकावर झेप घेऊ शकतो. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांचे प्लेईंग इलेव्हन आणि ईडन गार्डन्सची खेळपट्टी कशी असेल?, याबाबत जाणून घेऊया.
खेळपट्टीचा अहवाल
कोलकाताचे ईडन गार्डन हे फलंदाजांसाठी चांगले मैदान मानले जाते. चालू हंगामात या मैदानावर एक सामना खेळला गेला आहे, ज्यामध्ये फलंदाजांनी पूर्णपणे वर्चस्व गाजवले कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एकमेव सामना झाला. या सामन्यात दोन्ही संघांनी 200 धावांचा टप्पा ओलांडला होता. आजच्या सामन्यातही, खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते, परिणामी चाहते उच्च धावसंख्येचा सामना पाहू शकतात. मात्र, वेगवान गोलंदाजांनाही येथे मदत मिळते.
केकेआर वर्चस्व गाजवणार-
आतापर्यंत कोलकाता आणि लखनौ हे दोन्ही संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसले आहेत. मात्र, केकेआरचा फॉर्म लखनौपेक्षा चांगला राहिला आहे. कोलकाताने आपल्या स्फोटक फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांना चांगलेच हैराण केले आहे. अशा परिस्थितीत, आज केकेआर सामन्यावर वर्चस्व गाजवेल.
कोलकाता नाईट रायडर्सचे संभाव्य Playing XI
सुनील नारायण, फिल सॉल्ट, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर, नितीश राणा/व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा/वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट खेळाडू- सुयश शर्मा.
लखनौ सुपर जायंट्सची संभाव्य Playing XI
केएल राहुल, क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, अर्शद खान, नवीन-उल-हक/शमर जोसेफ, यश ठाकूर.
इम्पॅक्ट खेळाडू- एम सिद्धार्थ/देवदत्त पडिकल
संबंधित बातम्या:
उर्वशी रौतेला ऋषत पंतला नव्हे, तर फुटबॉलपटूला करतेय डेट?; फोटोवरील 'कॅप्शन'ने लक्ष वेधलं!
फोटो नव्हे तर हा भावनिक क्षण! धोनीने 2011च्या विश्वचषक ट्रॉफीला स्पर्श करताच भारतीय आठवणीत रमले
IPL 2024: नाव मोठं, लक्षण खोटं, महागड्या खेळाडूंनी वाट लावली, 17 कोटीच्या खेळाडूने तर लाज काढली!