आयपीएल 2024 चा लिलाव झाला तेव्हा कोट्यवधींच्या बोली लागल्या. सहा खेळाडूंवर 10 कोटींपेक्षा जास्त किमतीची बोली लागली. यातील अनेक क्रिकेटपटू आता आपल्या संघांवर ओझे बनले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, चेन्नई सुपर किंग्सपासून ते गुजरात टायटन्स फ्रँचायझीला काही खेळाडूंवर मोठी बोली लावणे महागात पडल्याचे आतापर्यंतच्या कामगिरीवरुन दिसून येत आहे.
आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. मिचेल स्टार्कवर कोलकाता नाइट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांची बोली लावली. दुसरा महागडा खेळाडू पॅट कमिन्स होता. तथापि, कमिन्स (5 सामने, 6 विकेट), 20.50 कोटी रुपयांना विकला गेला, तो सनरायझर्स हैदराबादसाठी चांगली कामगिरी करत आहे. पण त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी कॅमेरून ग्रीन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी चांगलाच महागात पडत आहे.
किंमत 17.50 कोटी, विकेट 0, 5 सामन्यात फक्त 68 धावा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सविरुद्ध कॅमेरॉन ग्रीनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अनेक दिग्गजांनी आरसीबीच्या या निर्णयावर टीका केली. मात्र आरसीबीने कॅमेरून ग्रीनला वगळण्यापूर्वी सलग 5 सामन्यांमध्ये मैदानात उतरवले. या पाच सामन्यांमध्ये ग्रीनला एकही बळी घेता आला नाही आणि तर तो फलंदाजीतही अपयशी ठरला. ग्रीनने पाच सामन्यात केवळ 68 धावा केल्या आहेत.
किंमत 11 कोटी, 6 पैकी 3 सामन्यात खातेही उघडले नाही
केवळ कॅमेरून ग्रीनच नाही तर अल्झारी जोसेफ आणि ग्लेन मॅक्सवेल यांनीही आपल्या कामगिरीतून आरसीबीच्या फ्रँचायझीला निराश केले. अल्झारीने आयपीएल 2024 मध्ये 3 सामने खेळले आणि त्याला फक्त एक विकेट घेता आली. आरसीबीने डिसेंबर 2023 मध्ये IPL लिलावात अल्झारी जोसेफवर 11.50 कोटी रुपयांची बोली लावली होती. कॅमेरून ग्रीन (17.50 कोटी) आणि विराट कोहली (15 कोटी) नंतर अल्झारी हा आरसीबीमधील सर्वात महागडा क्रिकेटर आहे. 11 कोटी रुपये किंमतीचा ग्लेन मॅक्सवेल या स्पर्धेत 6 सामन्यात केवळ 32 धावा करू शकला आहे.
मिचेल स्टार्कची कामगिरी नजरअंदाज-
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कदेखील अपेक्षेप्रमाणे कामगिरी करु शकलेला नाही. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने 4 सामने खेळले असले तरी त्याच्या खात्यात फक्त 2 विकेट्स जमा आहेत. मात्र, केकेआरच्या अन्य खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे स्टार्कची खराब कामगिरी सध्या नजरअंदाज झाल्याचे दिसत आहे.
चेन्नईच्या डॅरिल मिशलचीही कामगिरी खराब-
चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू डॅरिल मिशेलचीही आतापर्यंतची कामगिरी खराब राहिलेला आहे. चेन्नईने डॅरिल मिशलवर 14 कोटींची बोली लावली होती. न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलने या स्पर्धेत 5 सामन्यात 29.50 च्या सरासरीने आणि 125.53 च्या रन रेटने 118 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 34 धावा आहे.
10 कोटी रुपये किमतीच्या जॉन्सनने 4 सामन्यात 3 विकेट्स घेतल्या
गुजरात टायटन्सने स्पेन्सर जॉन्सनला 10 कोटी रुपयांना विकत घेतलेली आशाही पूर्ण होताना दिसत नाही. ऑस्ट्रेलियाच्या स्पेन्सरने आतापर्यंत 4 सामने खेळले असून त्यात त्याला केवळ 3 विकेट्स घेता आल्या आहेत. आयपीएल 2024 मध्ये ज्या खेळाडूंना मोठी किंमत मिळाली त्यात पॅट कमिन्स, हर्षल पटेल (11.75 कोटी), समीर रिझवी (8.40 कोटी), रिले रॉसो (8.00 कोटी) यांचा समावेश आहे. हर्षलने आतापर्यंत 5 सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत. रिझवीला आतापर्यंत 4 सामन्यांच्या 2 डावात संधी मिळाली आहे, ज्यामध्ये एकदा त्याने 14 धावा केल्या तर दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही. पंजाब किंग्जने अद्याप रिले रॉसोला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिलेली नाही.
20 लाख रुपये किमतीचे खेळाडू धावा करतायत-
आयपीएल 2024 मध्ये अनेक महागडे खेळाडू अपयशी ठरत असले तरी असे अनेक खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 20 लाख रुपये आहे. मात्र ते आक्रमक फलंदाजी करत आहे. यामध्ये गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन, शशांक सिंग आणि पंजाब किंग्सचा आशुतोष शर्माचा समावेश आहे. साई सुदर्शनने 6 सामन्यात 226 धावा केल्या असून तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनाही पंजाब किंग्जने 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीत विकत घेतले. शशांकने 5 सामन्यात 195.71 च्या स्ट्राईक रेटने 137 धावा केल्या आहेत. आशुतोषने 2 सामन्यात 200 च्या स्ट्राईक रेटने 64 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा, सात किंवा आठ क्रमांकावर फलंदाजी करतात. अशा परिस्थितीत त्याची कामगिरी सर्वांची मने जिंकत आहे.
संबधित बातम्या:
हार्दिक पांड्याचं सर्वात मोठं रहस्य...; माजी खेळाडूने सत्य लपवत असल्याचा केला दावा
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसारखी दिसणारी ही मिस्ट्री गर्ल कोण?; पाहा Photo's
दिल्लीचा विजय अन् 4 संघांचा क्रम बदलला;चेन्नईला सामना न खेळता फायदा झाला, पाहा IPL Points Table