Kavya Maran RCB vs SRH: तब्बल 549 धावा कुटल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 25 धावांनी नमवले. हैदराबादनं दिलेल्या 288 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीनं 262 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीकडून दिनेश कार्तिक आणि फाफ डु प्लेसिस यांनी लढा दिला, पण विजय मिळून देऊ शकले नाहीत. हैदराबादकडून पॅट कमिन्स यानं भेदक मारा केला. कमिन्सनं आरसीबीच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. आरसीबीला सात सामन्यात सहा पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादनं चौथ्या विजयाची नोंद केली. हैदराबादचा संघ आठ गुणांसह चौथ्या स्थानावर विराजमान आहे.

 

आरसीबीकडून विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी दमदार सुरुवात करून दिली. पण, विराटची विकेट पडली अन् पुढील 42 धावांत आरसीबीचे पाच फलंदाज माघारी परतले. विराट कोहली फिरकीच्या जाळ्यात अडकला. तर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने आरसीबीचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस झेलबाद केले. आरसीबीच्या झटपट दोन विकेट गेल्यानंतर हैदराबादची मालकीण म्हणजेच नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी काव्य मारन खूप आनंदी झाली. यावेळी ती अनेकदा नाचताना देखील दिसली. 







सोशल मीडियावर सध्या काव्याचे नाचतानाचे फोटो चर्चेत आले आहेत. नेटिझन्स तिच्या फोटोवर अनेक कमेंट्स करत आहेत. काव्या मारन या सन ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. सनराइजर्स हैदराबाद टीमची मालकी सन ग्रुपकडे आहे. काव्या पहिल्यांदा 2018 मध्ये सनराइजर्स हैदराबाद टीमला चिअर करण्यासाठी स्टेडिअमला आली होती. काव्या सध्या सन टीव्ही नेटवर्कच्या ओटीटी प्लॅटफॉर्म सन नेक्स्ट Sun NXT ची प्रमुख आहे. काव्याला क्रिकेट खूप आवडतं. 


कोण आहे काव्या मारन?


काव्या मारनचा जन्म 6 ऑगस्ट 1992 रोजी चेन्नईमध्ये झाला. 33 वर्षीय काव्या मारन ही सन ग्रुप आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचे मालक कलानिती मारन यांची मुलगी आहे. ती सनरायझर्स हैदराबाद आयपीएल टीमची मालक आणि सीईओ आहे. काव्याची एकूण संपत्ती 409 कोटी रुपये आहे. काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉम केले आहे, त्यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे. काव्याचे आजोबा एम करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री होते. 


संबंधित बातम्या:


दिनेश कार्तिकने लगावला यंदाच्या आयपीएलमधील सर्वांत लांब षटकार; चेंडू थेट बाहेर, एकदा Video बघाच!


RCB vs SRH: 549 धावा, 38 षटकार, 81 चौकार; आरसीबी अन् हैदराबादच्या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद


रोहित शर्माची भर मैदानात उतरली पॅन्ट...; पत्नी रितिकाची रिॲक्शन व्हायरल, Video एकदा पाहाच!