SRH vs RCB IPL 2024: सनरायझर्स हैदराबादने (SRH) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर (RCB) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या म्हणजेच तीन विकेट गमावून 287 धावा करत अशक्यप्राय लक्ष्य ठेवले होते. 288 धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना  विराट कोहली, कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तिघांची झुंज अपयशी ठरली. आरसीबीने 262 धावा केल्या. 


कोहली-डुप्लेसिस यांनी 38 चेंडूत 80 धावांची तुफानी सलामी दिली. कोहली सातव्या षटकात बाद झाल्यानंतर डुप्लेसिसने शानदार अर्धशतक झळकावले. बंगळुरूचा अर्धा संघ 122 धावांवर बाद झाला. कार्तिकने हैदराबादला सहजासहजी विजय मिळवू दिला नाही. त्याने चौफेर फटकेबाजी करीत हैदराबादवर दडपण आणले होते.


कार्तिकने लगावला आयपीएलमधील सर्वात लांब षटकार-


जबरदस्त फॉर्मात असलेल्या दिनेश कार्तिकने अवघ्या 35 चेंडूत 83 धावांची तुफानी खेळी केली. जरी तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही, तरीही त्याने स्फोटक फलंदाजी करून आरसीबीसाठी पराभवाचे अंतर कमी केले. तसेच कार्तिकने हंगामातील सर्वात लांब म्हणजे 108 मीटरचा षटकार टोलावला.






नटराजनच्या चेंडूवर 108 मीटरचा षटकार


15 षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या 187/6 होती. संघाला विजयासाठी पाच षटकात 101 धावांची गरज होती. 16व्या षटकाची जबाबदारी टी. नटराजन यांच्या खांद्यावर होती. दिनेश कार्तिकने पॅड लाइनवर टाकलेला चेंडू मिड-विकेटच्या दिशेने हवेत मारला. बॅटला आदळल्यानंतर चेंडू थेट स्टेडियमच्या छताला लागला आणि खाली पडला. हा 108 मीटरचा हा षटकार होता. 






विक्रमांनी भरलेल्या सामन्यात हैदराबाद विजयी-


ट्रॅव्हिस हेडचे आक्रमक शतक आणि कर्णधार पॅट कमिन्सच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 25 धावांनी पराभव केला. हेडच्या पहिल्या T20 शतकाशिवाय, हेनरिक क्लासेनने धडाकेबाज 67 धावा केल्या, ज्याच्या मदतीने सनरायझर्सने तीन गडी गमावून 287 धावा केल्या आणि स्पर्धेच्या इतिहासात विक्रमी धावसंख्या नोंदवली. प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ सात गड्यांच्या मोबदल्यात 262 धावाच करू शकला. या आयपीएल सामन्यात 40 षटकात 549 धावा झाल्या जो एक विक्रम आहे.


संबंधित बातम्या:


RCB vs SRH: 549 धावा, 38 षटकार, 81 चौकार; आरसीबी अन् हैदराबादच्या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद


रोहित शर्माची भर मैदानात उतरली पॅन्ट...; पत्नी रितिकाची रिॲक्शन व्हायरल, Video एकदा पाहाच!


आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा; या 15 खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता