IPL 2024: KKR vs RR: आज कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना होणार आहे. कोलकातामधील इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 


राजस्थान रॉयल्स संघ दोन वेळा जेतेपद चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करेल. केकेआर आणि राजस्थान सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. कोलकाता आणि राजस्थान गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामन्याची अपेक्षा आहे. 


केकेआरचा नारायण यांच्याशिवाय फिल सॉल्टही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. लखनौविरुद्ध त्याने 89 धावांची नाबाद मॅच-विनिंग इनिंग खेळली. केकेआरचा संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे. केकेआर आज संघात कोणतेही बदल करणार नाही. राजस्थानकडून संघात बदल केले जाणार नाही. जॉस बटलर आज खेळणार की नाही, याबाबत अजून काही स्पष्ट झालेले नाही. पंजाबविरुद्ध बटलर खेळला नव्हता. 


केकेआरची संभाव्य Playing XI


फिल सॉल्ट, सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.


राजस्थानची संभाव्य Playing XI


संजू सॅमसन (कर्णधार), रायन पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल/जोस बटलर, केशव महाराज, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन.


केकेआरचा संपूर्ण संघ-


श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, रहमनुल्ला गुरबाज, फिल सॉल्ट, सुनील नारायण, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरूण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन सकारिया, मिचेल स्टार्क, अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, शेरफेन रुदरफोर्ड, मनिष पांडे, मुजीब उर रहमान, दुशमंथा चमीरा, साकिब हुसेन


राजस्थानचा संपूर्ण संघ-


संजू सॅमसन (कर्णधार), जॉस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठौर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, प्रसीद कृष्णा, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, आवेश खान, शुभम दुबे, रोवमॅन पोवेल, नांद्रे बर्गर


संबंधित बातम्या:


RCB vs SRH: 549 धावा, 38 षटकार, 81 चौकार; आरसीबी अन् हैदराबादच्या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद


रोहित शर्माची भर मैदानात उतरली पॅन्ट...; पत्नी रितिकाची रिॲक्शन व्हायरल, Video एकदा पाहाच!


आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा; या 15 खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता