Most Runs And Wickets In IPL 2024 : पंजाब किंग्सविरोधात मुंबई इंडियन्सनं (Mumbai indians) 9 धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांनी प्रभावी कामगिरी केली. या कामगिरीच्या बळावर दोघांनीही फायदा झालाय. जसप्रीत बुमराह यानं पर्पल कॅपवर कब्जा मिळवलाय. याआधी ही कॅप राजस्थानच्या युजवेंद्र चहल याच्याकडे होती. दुसरीकडे रोहित शर्मानं ऑरेंज कॅप स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. जसप्रीत बुमराहने पंजाबविरोधात चार षटकांमध्ये फक्त 21 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत धाडलं होतं. जसप्रीत बुमराहने सात सामन्यात 12.85 च्या सरासरीने 13 विकेट घेतल्या आहेत. तर युजवेंद्र चहल यानं सात सामन्यात 18.08 च्या सरासरीने 12 विकेट घेतल्या आहेत. पर्पल कॅपची स्पर्धा अतिशय रोमांचक झाली आहे. दुसरीकडे रोहित शर्मानं ऑरेंज कॅप स्पर्धेत आपली दावेदारी ठोकली आहे. 


 कोणत्या गोलंदाजांचा दबदबा


यंदाच्या आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पडलाय. सर्वाधिक धावांचा विक्रमही यंदा दोन वेळा मोडला गेला. चौकार-षटकारांचा पाऊस पडत असतानाच काही गोलंगाजांनी करिष्माई गोलंदाजी केली आहे.  मुंबईचा रोहित शर्मा याच्या नावावर आयपीएलमधील सर्वाधिक विकेट आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर युजवेंद्र चहल आहे. तिसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा गेराल्ड कोइत्जे याचा क्रमांक लागतो. कोइत्जे यानं सात सामन्यात 21.92 च्या सरासरीने 12 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा खलील अहमद, पंजाबचा कगिसो रबाडा, चेन्नईचा मुस्ताफिजुर रहमान आणि पंजाबचा हर्षल पटेल यांचा क्रमांक लागतो. या सर्वांनी प्रत्येकी 10-10 विकेट घेतल्या आहेत. 


ऑरेंज कॅपवर विराट कोहलीचा कब्जा - 


ऑरेंज कॅपच्या शर्यातीत आरसीबीचा विराट कोहली सर्वाधिक आघाडीवर आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत विराट कोहलीचा दबदबा दिसत आहे. विराट कोहलीने सात सामन्यात 72 च्या सरासरीने 361 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा रियान पराग याचा क्रमांक आहे. रियान पराग यानं 63.60 च्या सरासरीने सात सामन्यात 318 धावा केल्या आहेत. या यादीत मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. रोहित शर्माने सात सामन्यात 49.50 च्या सरासरीने 297 धावा केल्या आहेत. कोलकात्याचा सुनील नारायण या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आहे. नारायण यानं सहा सामन्यात 46 च्या सरासरीने 276 धावांचा पाऊस पाडला आहे.  पाचव्या क्रमांकावर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याचा क्रमांक लागतो. संजू सॅमसन यानं सात सामन्यात 55 च्या सरासरीने 276 धावा केल्या आहेत. 


आणखी वाचा :


अजिंक्यनं वाढवलं चेन्नईचं टेन्शन, लखनौविरोधात ऋतुराज मोठा निर्णय घेणार?


VIDEO : हिटमॅन रोहित शर्मानं मुंबईचं नेतृत्व संभाळलं, अखेरच्या षटकात हार्दिक फक्त पाहातच राहिला


100 टक्के फिट नसतानाही IPL खेळतोय, सूर्याचं फिटनेस अपडेट समोर