IPL 2024, MI vs KKR कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सनं मुंबई इंडियन्सला पराभूत करत प्लेऑफमध्ये दिमाखदार प्रवेश केला आहे. कोलकाताच्या या वाटचालीत त्यांची सलामीची जोडी फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांच्या फलंदाजीचं योगदान मोठं आहे. मात्र, मुंबई इंडियन्सच्या बॉलिंग पुढं केकेआरचे दोन्ही सलामीवीर अपयशी ठरले. पावसामुळं मॅच सुरु होण्यास उशीर झाल्यानं ओव्हर्सची संख्या कमी करण्यात आलेली होती. फलंदाजीला आलेल्या केकेआरच्या सलामीवीरांपुढं मोठं आव्हान होतं. मात्र, फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांना मोठी खेळी करण्यास अपयश आलं. मुंबई इंडियन्सचा प्रमुख बॉलर जसप्रीत बुमराहनं सुनील नरेनला शुन्यावर बाद केलं. 


नरेनला काही कळायच्या आत दांड्या गुल


मुंबई इंडियन्सनं पहिल्याच ओव्हरमध्ये फिल सॉल्टला बाद केलं होतं. यानंतर दुसरी ओव्हर जसप्रीत बुमराह टाकत होता. या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर बुमराहनं टाकलेला भन्नाट यॉर्कर सुनील नरेन फक्त पाहत राहिला. बुमराहनं टाकलेला बॉल कधी स्टम्पवर जाऊन आदळला हे सुनील नरेनला समजलचं नाही. कोलकातासाठी स्टार फलंदाज ठरलेला सुनील नरेन शुन्यावर बाद झाला. 


पाहा व्हिडीओ :






बुमराहकडे पर्पल कॅफ


जसप्रीत बुमराहनं कोलकाता नाईट रायडर्सच्या दोन विकेट घेतल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये 20 विकेट घेत त्यानं पर्पल कॅपवर नाव कोरलं आहे. जसप्रीत बुमराह च्यानंतर हर्षल पटेलनं देखील 20 विकेट घेतल्या आहेत. मात्र, त्यानं धावा अधिक दिल्या आहेत.  


सुनील नरेनची यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी


कोलकाता नाईट रायडर्सनं मुंबई इंडियन्सला 18 धावांनी पराभूत केलं. या मॅचमध्ये सुनील नरेनला जसप्रीत बुमरहानं शुन्यावर बाद केलं. मात्र, बॉलिंग करताना नरेननं मुंबईची एक विकेट घेतली. त्यामुळं आयपीएलच्या एक पर्वात 15 विकेट आणि 400  धावा करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. 


सुनील नरेननं यंदाच्या आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केलीय. त्यानं 12 मॅचमध्ये 461 धावा केल्या असून त्यामध्ये एका शतकाचा समावेश देखील आहे. सुनील नरेन यानं तीन अर्धशतकं केली आहेत


कोलकाता नाईट रायडर्सनं प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. कोलकातानं 18 गुणांसह गुणतालिकेतील पहिलं स्थान कायम ठेवलंय. केकेआरनं मुंबईला यंदाच्या आयपीएलमध्ये दोनवेळा पराभूत केलंय.


संबंधित बातम्या : 


KKR vs MI live Score IPL 2024: कोलकाता नाइट रायडर्सचा 18 धावांनी विजय, मुंबई इंडियन्सला नमवले


IPL 2024: KKR vs MI: मुंबई इंडियन्सविरुद्ध कोलकाता नाइट रायडर्सचा 18 धावांनी विजय