KKR vs MI live Score IPL 2024: कोलकाता नाइट रायडर्सचा 18 धावांनी विजय, मुंबई इंडियन्सला नमवले

KKR vs MI Live Score, IPL2024 : आयपीएलमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स आमने सामने येणार आहेत. आज आयपीएलमधील 60 वी मॅच आहे.

युवराज जाधव Last Updated: 12 May 2024 01:33 AM
केकेआरचा 18 धावांनी विजय

केकेआरने मुंबईविरुद्ध 18 धावांनी विजय मिळवला.

सुर्यकुमार यादव माघारी

सुर्यकुमार यादवही बाद झाला आहे. 

रोहित शर्मा बाद

मुंबईला दुसरा धक्का बसला आहे. रोहित शर्मा झेलबाद झाला आहे. रोहितने 24 चेंडूत 19 धावा केल्या.

मुंबई इंडियन्सला पहिला धक्का

मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला आहे. इशान किशन 40 धावांवर झेलबाद झाला. 

कोण मारणार बाजी?

मुंबईला विजयसाठी 158 धावांचं आव्हान

केकेआरने मुंबईला विजयसाठी 158 धावांचं आव्हान दिलं आहे.

नितीश राणा धावबाद

केकेआरचा नितीश राणा धावबाद झाला आहे. नितीश राणाने 33 धावा केल्या.

केकेआरचा चौथा गडी बाद

केकेआरला चौथा धक्का बसला आहे. व्यंकटेश अय्यर 42 धावा करत झेलबाद झाला. 

7 षटकांत केकेआरच्या 61 धावा

केकेआरने 7 षटकांत 3 विकेट्स गमावत 61 धावा केल्या आहेत.

कोलकाताला तिसरा धक्का

कोलकाताला तिसरा धक्का बसला आहे. कर्णधार श्रेयस अय्यर 7 धावा करत बाद झाला.

कोलकाताला दुसरा धक्का

कोलकाताला दुसरा धक्का बसला आहे. कोलकाताचे आक्रमक सलामीवीर फिलिप सॉल्ट आणि सुनील नरेन बाद झाले आहेत. 

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा घेतला निर्णय

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

9 वाजता नाणेफेक होणार

मुंबई आणि कोलकाताच्या सामन्याची 9 वाजता नाणेफेक होईल. तर 9.15 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

नाणेफेकीला होणार उशीर

कोलकाता आणि मुंबई यांच्यातील सामन्याच्या नाणेफेकीला उशीर होणार आहे. वास्तविक, कोलकातामध्ये पाऊस पडत आहे. तथापि, चांगली गोष्ट म्हणजे संपूर्ण मैदान झाकलेले आहे. येथील ड्रेनेज व्यवस्थाही चांगली आहे. अशा परिस्थितीत पाऊस थांबताच सामना सुरू होऊ शकतो.

मुंबई अन् कोलकाताचा रद्द होऊ शकतो सामना

कोलकातामध्ये तुफान पाऊस

KKR vs MI : आजही धावांचा पाऊस पडणार?

कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आजच्या मॅचमध्ये धावांचा पाऊस पडतो का ते पाहावं लागणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून फिल सॉल्ट आणि सुनील नरेन वादळी फलंदाजी करत आहेत. 

KKR vs MI : मुंबई इंडियन्सचं कोलकाता नाईट रायडर्सवर भारी

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स 33 वेळा आमने सामने आले आहेत. मुंबईनं 23 वेळा विजय मिळवला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सनं 10 मॅचमध्ये विजय मिळवला आहे.

केकेआरला प्लेऑफच तिकीट निश्चित करण्याची संधी

कोलकाता नाईट रायडर्सकडे जवळपास तीन वर्षानंतर प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. त्यासाठी कोलकाताला मुंबईला पराभूत करावं लागेल.

KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा होम ग्राऊंडवर अखेरचा सामना

कोलकाता नाईट रायडर्सचा  यंदाच्या हंगामातील होम ग्राऊंडवरील अखेरचा सामना आज आहे.

KKR vs MI : मुंबई इंडियन्स अन् कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने

आयपीएलमध्ये आज कोलकाता येथे मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने येणार आहेत. ही आयपीएलमधील  60 वी मॅच आहे.

पार्श्वभूमी

KKR vs MI Live Score Updates, IPL2024 : आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स आमने सामने येणार आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचा आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत प्लेऑफचं तिकीट निश्चित करण्याचा प्रयत्न असेल. तर, मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील राहिलेल्या मॅचेस जिंकण्याचा प्रयत्न असेल.    

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.