IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईच्या संघानं (Mumbai Indians) कामगिरी प्रदर्शन केलं आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात मुंबईच्या संघाला 14 सामन्यापैकी फक्त चार सामने जिंकता आले. तर, दहा सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. मुंबईच्या संघानं आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सलग आठ सामने गमावले आहेत. रोहितच्या कारकिर्दीतील आयपीएलचा पंधरावा हंगाम सर्वात खराब ठरला आहे. दरम्यान, मुंबई आणि दिल्ली (Mi vs DC)  यांच्यातील सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) नव्या विक्रमाला गवसणी घातली. त्यानं मुंबई इंडियन्ससाठी 148 वा विकेटस घेऊन हरभजन सिंहला (Harbhajan Singh) मागे टाकलं आहे. याशिवाय, आयपीएलच्या सात हंगामात 15 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेऊन लसिथ मलिंगाच्या (Lasith Malinga) विक्रमाशी बरोबरो केली आहे. 


दिल्लीविरुद्ध चमकदार कामगिरी
दिल्लीविरुद्ध सामन्यात जसप्रीत बुमराहन चार षटकात 25 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. या सामन्यात बुमराहनं मिचेल मार्श (0 धावा), पृथ्वी शॉ (24 धावा), रोव्हमन पॉवेलला (43 धावा) आपल्या जाळ्यात अडकवून माघारी धाडलं. ज्यामुळं मुंबईच्या संघाला सामन्यावर मजबूत पकड मिळवता आली.


आयपीएल 2022 मध्ये बुमराची कामगिरी
जसप्रीत बुमराहनं आयपीएल 2022 मध्ये मुंबईसाठी 14 सामन्यांमध्ये भाग घेतला. या दरम्यान त्यानं 25.53 च्या सरासरीनं एकूण 15 विकेट घेतल्या. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात बुमराहची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 10 धावांत पाच विकेट्स घेतल्या. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ही कामगिरी केली.


मलिंगाच्या विक्रमाशी बरोबरी
जसप्रीत बुमराह हा आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरलाय. बुमराहनं सलग सातव्या आयपीएल हंगामात 15 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. बुमराहनं या बाबतीत त्याचा माजी सहकारी लसिथ मलिंगाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. मलिंगानं मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलच्या सलग सात हंगामात 15 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. 


हरभजन सिंहचा मोडला विक्रम
दिल्लीविरुद्ध सामन्यात जसप्रीत बुमराहनं त्याच्या कारकिर्दितील 148 वा विकेट घेऊन मुंबईचा माजी गोलंदाज हरभजन सिंहनं मागं टाकलं आहे.  हरभजन सिंहनं मुंबई इंडियन्ससाठी 147 विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत लसिथ मलिंगा195 विकेट्ससह अव्वल स्थानी आहे. तर, जसप्रीत बुमराह दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. 


हे देखील वाचा-