CSK : चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाची यंदाची कामगिरी अत्यंत खराब असल्याने त्याचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. पण आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. संघाचा हुकमाचा एक्का म्हणजेच रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) उर्वरीत आयपीएलला मुकणार आहे. रवींद्र जाडेजाच्या बरगडीला दुखापत झाल्यामुळे तो आयपीएल 2022 चे उर्वरीत सामने खेळू शकणार नसल्याची माहिती समोर आली आहे. यंदाच्या आयपीएलच्या सुरुवातीला जाडेजा कर्णधार म्हणून संघात होता. पण मध्येच कर्णधारपद पुन्हा धोनीकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर मागील सामन्यात जाडेजा संघातही नव्हता आणि आता तो उर्वरीत आयपीएलला मुकणार असल्याचंही समोर आलं आहे. चेन्नई संघाला दुखापतीमुळे यंदा बरच नुकसान सहन करावं लागलं आहे. याआधी मुख्य गोलंदाज दीपक चहरही दुखापतीमुळं स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
बंगळुरूविरुद्ध सामन्यात रवींद्र जाडेजाला दुखापत
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रवींद्र जडेजाला दुखापत झाली. एवढेच नव्हेतर दुखापतीमुळं त्याला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं होतं. यादरम्यान, रवींद्र जडेजाला आयपीएल 2022 मधून बाहेर पडावं लागू शकते, अशी बातम्यांनी वेग धरला होता. त्यानंतर आता अधिकृतपणे चेन्नई सुपरकिंग्सनेही याबाबत माहिती दिली आहे.
IPL 2022 मध्ये जाडेजाचं खराब प्रदर्शन
आयपीएल सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं रवींद्र जाडेजाकडं चेन्नईच्या संघाचं कर्णधारपद सोपवलं होतं. परंतु, रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. रवींद्र जाडेजानं आठ सामन्यात चेन्नईच्या संघाचं नेतृत्व केलंय. यापैकी सहा सामन्यात चेन्नईला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर रवींद्र जाडेजानं पु्न्हा कर्णधाराची जबाबदारी धोनीकडं सोपवली.
हे देखील वाचा-
- Ravichandran Ashwin : दिल्लीविरुद्ध आश्विनची बॅट तळपली अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, राजस्थानचा पंतलाही टोला
- Virat Kohli : खराब फॉर्मवर विराट कोहलीकडून एका वाक्यात टीकाकारांना उत्तर, म्हणाला..
- Virat Kohli : ज्या-ज्या वेळी शून्यावर बाद त्या-त्या वेळी विराट हसत मैदानाबाहेर,कोहलीच्या या 'हास्या'मागे खरं कारण काय?