RR vs DC : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 58 वा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC) या दोन संघात पार पडत आहे. दिल्लीने नुकतीच नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. सामना सायंकाळी असल्याने दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता असल्याने पंतने हा निर्णय घेतला असावा. पण या मैदानात मागील दोन सामन्यांत प्रथम फलंजाजी करणाऱ्या संघाने दिलेले माफक आव्हानही दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला पार करता आलेले नाही. त्यामुळे आज नेमकं काय होणार हे पाहावं लागेल.
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू स्टार खेळाडू शिमरॉन हीटमायर मायदेशी परतल्याने त्याच्या जागी रॅसी डस्सेन (Rassie van der Dussen) याला संधी दिली आहे. तर दिल्लीने संघात दोन बदल केले असून त्यांनी
रिपल पटेल जागी ललित यादवला आणि खलील अहमदच्या जागी चेतन साकरियाला संधी दिली आहे. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...
राजस्थान अंतिम 11
संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडीक्कल, रॅसी डस्सेन, रियान पराग, रवीचंद्रन आश्विन, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल
दिल्ली अंतिम 11
केएस भरत, डेव्हिड वार्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया
हे देखील वाचा-