RR vs DC : नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC) या दोन संघात पार पडत आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी गोलंदाजीही चांगली केली असली तरी राजस्थानचा अष्टपैलू रवीचंद्रन आश्विनने एकहाती उत्तम झुंज देत अप्रतिम अर्धशतक लगावलं आहे. विशेष म्हणजे आयपीएलमधील त्याचं हे पहिलचं अर्धशतक ठरलं आहे. एकीकडे बटलर, संजू हे दिग्गज तंबूत परतले असले तरी आश्विनने दमदार फलंदाजी केली. दरम्यान राजस्थानने देखील आश्विनला थेट पहिला गडी बाद झाल्यावर फलंदाजीला पाठवत एक वेगळा डाव खेळला जो यशस्वी देखील झाला आहे. आश्विनने दमदार खेळी केली मात्र नेटकऱ्यांनी मात्र सोशल मीडियावर हटके मीम्स शेअर करत या खेळीला आणखी यादगार केलं आहे.


या मीम्सची सुरुवातच राजस्थान रॉयल्सने केली. राजस्थानच्या सोशल मीडिया टीमने सर्वात आधी दिल्लीचा कर्णधार पंतचा फोटो शेअर केला. ज्यावर कम ऑन एश असं लिहिलं होतं, कसोटी सामन्यांमध्ये आश्विन गोलंदाजी करताना पंत यष्टीरक्षण करताना आश्विनला चिअर करतो. पण आज पंतच्या संघाविरुद्ध खेळताना आश्विन फटकेबाजी करताना पंतला टोला देत हे मीम शेअर करण्यात आलं.



आश्विनचं दमदार अर्धशतक 


आश्विनने सामन्यात 37 चेंडूत लगावलेलं हे अर्धशतक त्याच्या कारकिर्दीतील पहिलं आयपीएल अर्धशतक आहे. सामन्यात त्याने 38 चेंडूत 50 धावा केल्या असून यावेळी त्याने सहा चौकार आणि दोन षटकार देखील लगावले. थेट वन डाऊन येत आश्विनने केलेल्या या खेळीचं कौतुक होत असून काही मीम्मही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर एक नजर फिरवू...




 


हे देखील वाचा-