Rahul Sharma, IPL : 2008 मध्ये आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात झाली, तेव्हापासून आतापर्यंत भारताला आणि जगाला अनेक दिग्गज खेळाडू मिळाले. पण काही असेही खेळाडू आहेत, ज्यांनी आयपीएल गाजवलं, रात्रीत स्टार झाले, त्यांना स्टारडम जपता आले नाही, ते गायब झाले. असेच काहीसं राहुल शर्मा याच्याबद्दल झालेय. आयपीएलमध्ये राहुल शर्माने शानदार कामगिरी केली, त्याला भारतीय संघात संधीही मिळाली. आयपीएलमध्ये त्याने प्रभावी कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधलं. पण राहुल शर्मा याला स्टारडम जपता आले नाही. रेव्ह पार्टीमुळे राहुल शर्माचं क्रिकेट करियर खराब झालं.


राहुल शर्मा याची गोलंदाजी पाहून अनेकांनी त्याची तुलना महान फिरकीपटू अनिल कुंबळे याच्यासोबत केली. पण राहुल शर्मा याला स्टारडम जपता आले नाही. रेव्ह पार्ट्यामुळे करियर खराब झालं. राहुल शर्माने आय़पीएलमधील कामगिरीच्या बळावर टीम इंडियातही स्थान पटकावलं, पण  रेव्ह पार्टीने  करियर संपवलं. 


फिरकीपटू राहुल शर्माने याने आयपीएल 2011 मध्ये पुणे वॉरियर्सविरोधात 4 षटकांमध्ये फक्त सात धावा देत दोन विकेट घेतल्या होत्या. त्याच्या या स्पेलमुळे अल्पावधीतच तो प्रसिद्धीझोतात आला. 2011 च्या हंगामात राहुल शऱ्माने याने 14 सामन्यात 16 विकेट घेतल्या होत्या. यावेळी त्याची  इकॉनॉमी 6 पेक्षा कमी होती.  आयपीएलमधील शानदार कामगिरीमुळे राहुल शर्माला टीम इंडियात स्थान मिळाले. पण 2011 नंतर राहुल शर्माची कामगिरी खालावली. राहुल शर्माला फक्त एकच हंगाम गाजवता आला, त्यानंतर तो फ्लॉप खेळाडूच्या यादीत फेकला गेला. यादरम्यान राहुल शर्माचे नाव रेव्ह पार्टीमध्ये आलं. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्याचं नाव खराब झालं. त्यानंतर दुखापतीनेही घेरलं. त्यामुळे तो क्रिकेटपासून दूरावला गेला. 


राहुल शर्मा याने दिल्ली आणि चेन्नई सुपर किंग्स संघाकडूनही आयपीएलचे सामने खेळले. दुखापतीनंतर त्याला कमबॅक करता आले नाही. 2022 मध्ये राहुल शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधून रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. राहुल शर्माने 44 आयपीएल सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 27 ची सरासरी आणि 7 च्या इकॉनॉमीने 40 विकेट घेतल्या. राहुल शर्मा याने चार वनडे आणि 2 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले आहेत.