Wanindu Hasaranga Ruled Out IPL 2024 : गुजरात आणि हैदराबाद यांच्यामध्ये अहमदाबादच्या मैदानावर आमनासामना सुरु आहे. या सामन्यावेळीच हैदराबादच्या चाहत्यांसाठी खराब बातमी येऊन धडकली आहे. श्रीलंकेचा मिस्ट्री फिरकी गोलंदाज वानिंदु हसरंगा दुखापतग्रस्त झाल्याचं समोर आले आहे.
आपल्या फिरकी गोलंदाजीने आणि आक्रमक फलंदाजीने वानिंदु हसरंगा एकहाती सामना फिरवू शकतो. त्यामुळे हा हैदराबादसाठी मोठा धक्का मानला जातोय. कारण, वानिंदु हसरंगा दुखापतीमुळे आयपीएल 2024 च्या संपूर्ण हंगामाला मुकणार आहे. हसरंगा दर्जेदार फिरकी गोलंदाजी करतो, त्याशिवाय फलंदाजीमध्येही आपलं मोलाचं योगदान देतो. त्यामुळे हैदराबादसाठी हा मोठा धक्का मानला जातो.
वानिंदु हसरंगाच्या डाव्या टाचेला दुखापत झाली आहे, त्यामुळे पुढील काही दिवस तो क्रिकेटपासून दूर राहणार आहे. वानिंदु हसरंगाच्या रुपाने हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. आयपीएलच्या मिड सिजनपर्यंत हैदराबादला त्याची कमी भासणार आहे. संथ खेळपट्टीवर वानिंदु हसरंगा प्रभावी गोलंदाजी करतो, त्याशिवाय तो तळाला फलंदाजीमध्येही योगदान देऊ शकतो. 2024 टी 20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंका क्रिकेट मंडळाने त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचा परवानगी दिली नाही.
एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना श्रीलंका क्रिकेटचे सीईओ यांनी हसरंगाच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की,हसरंगाची टाच सुजली होती आणि इंजेक्शन घेतल्यानंतर तो खेळत होता. त्यामुळेच विश्वचषकापूर्वी त्याने आपली समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. या दुखापतीमुळे तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. हसरंगा दुखापतीवर उपचार घेण्यासाठी तो दुबाईला जाणार आहे.