Womens T20 Challenge 2022: महिला टी-20 चॅलेंज 2022 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सुपरनोव्हास आणि ट्रेलब्लेझर्स (Supernovas vs Trailblazers) आमने सामने आले होते. हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) सुपरनोव्हास संघाचं नेतृत्व करत आहे. तर, स्मृती मानधना(Smriti Mandhana) ट्रेलब्लेझर्सच्या संघाचं जबाबदारी संभाळत आहे. पुण्याच्या महाराष्ट्र असोसिएशन क्रिकेट स्टेडियमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात सुपरनोव्हासनं ट्रेलब्लेझर्सच्या संघाचा 49 धावांचा पराभव केला आहे. या सामन्यात सुपरनोव्हासनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर सुपरनोव्हासनं 20 षटकात सर्वबाद 163 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ट्रेलब्लेझर्सच्या संघाला 114 पर्यंत मजल मारता आली.
सुपरनोव्हास- ट्रेलब्लेझर्स सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे-
- नाणेफेक जिंकल्यानंतर सुपरनोव्हासकडून सलामी देण्यासाठी प्रिया पुनिया (22 धावा) आणि डिआंड्रा डॉटिन (32 धावा) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली.
- दरम्यान, पाचव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर डॉटीनं धावचीत झाली. त्यानंतर प्रिया पुनियाही बाद झाली.
- या सामन्यात हरलीन देओल (35 धावा) आणि कर्णधार हरमनप्रीत कौरनं संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, सलमा खातूनं भेदक गोलंदाजी करत हरलीन देओल माघारी धाडलं.
- सुपरनोव्हासकडून हरमनप्रीत कौरनं सर्वाधिक 37 धावा केल्या. प्रिया पुनिया, डिआंड्रा डॉटीन आणि हरलीन देओलनंतर सुपरनोव्हासच्या कोणत्याही फलंदाजाला 15 धावांचा आकडा गाठता आला नाही.
- ट्रेलब्लेझर्सकडून हॅली मथ्यूजनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, सलमा खाननं दोन विकेट्स मिळवल्या. याशिवाय, राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतली.
- सुपरनोव्हासनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ट्रेलब्लेझर्सच्या संघाची चांगली सुरुवात झाली.
- सलामीवीर स्मृती मानधना आणि हॅली मॅथ्यूज पहिल्या विकेट्ससाठी 39 धावांची भागेदारी केली.
- परंतु, पूजा वस्त्राकर यांनी हॅली मॅथ्यूजच्या रुपात ट्रेलब्लेझर्सच्या रुपात पहिला धक्का दिला. त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्स मैदानात आली. तिनं 21 चेंडूत 24 धावा.
- जेमिमाह रॉड्रिग्स बाद झाल्यानंतर ट्रेलब्लेझर्सच्या एकाही फलंदाजीला मोठी धावसंख्या करता आली नाही.ट्रेलब्लेझर्सनं 20 षटकात 9 विकेट्स गमावून 114 धावा केल्या.
- सुपरनोव्हासकडून पूजा वस्त्राकरनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, अलाना किंगला दोन विकेट मिळाल्या. याशिवाय, मेघना सिंह आणि सोफी एक्लेस्टोन यांच्यात खात्यात एक-एक विकेट जमा झाली.
हे देखील वाचा-