IPL Mini Auction 2023 Live: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी लिलाव सुरु झाला असून सर्वात पहिलीच बोली जागतिक क्रिकेटमधील स्टार खेळाडू केन विल्यमसन (Kane Williamson) याच्यावर लागली. सनरायझर्स हैदराबादचा (SRH) माजी कर्णधार केनला आयपीएल 2023 पूर्वी हैदराबाद संघाने रिलीज केलं. ज्यानंतर आता केनला गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) 2 कोटींच्या बेस प्राईसला केनला विकत घेतलं आहे. त्यामुळे आता आयपीएल 2022 च्या चॅम्पियन संघासोबत केन मैदानात उतरणार आहे. हार्दिक पांड्याच्या टोळीत एक दमदार फलंदाज आता खेळताना दिसणार.


आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेआधी सर्व संघांनी आपापल्या रिटेन आणि रिलीज केलेल्याा खेळाडूंची यादी जाहीर करण्याची सूचना बीसीसीआयने दिली होती. ज्यानंतर बऱ्याच दिग्गज खेळाडूंना संघानी रिलीज केल होतं. यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) तर कर्णधार केन विल्यमसनलाच (Kane Williamson) बाहेरचा रस्ता दाखवला होता. ज्यानंतर आता मिनी ऑक्शनमध्ये हैदराबाद त्याला पुन्हा विकत घेईल असे वाटत होते. मात्र त्याच्यावर केवळ गुजरात संघानेच बोली लावली आणि 2 कोटींच्या बेस प्राईसला तो विकला गेला. 


केन आणि हैदराबाद


न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने मागील 8 वर्षांत हैदराबादसाठी एकूण 76 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 36.22 च्या सरासरीने आणि 126.03 च्या स्ट्राइक रेटने 2101 धावा केल्या. त्याने एकूण 46 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. त्याला 2018 मध्ये डेव्हिड वॉर्नरनंतर संघाचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. पण आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार म्हणून खेळलेल्या केन विल्यमसनने त्या हंगामात संघासाठी 13 सामने खेळले आणि 19.64 च्या सरासरीने 216 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेटही फक्त 93.51 इतकाच होता. त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबादने 2022 मध्ये 14 पैकी केवळ 6 सामनेच जिंकले होते. ज्यामुळे आयपीएल संपताना संघ गुणतालिकेत 8 व्या क्रमांकावर राहिला. याशिवाय सनरायझर्स हैदराबादने IPL 2022 च्या मेगा लिलावात केनला तब्बल 14 कोटी रुपयांना रिटेन केलं होतं. मात्र, तो संघाच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. या साऱ्या गोष्टींचा विचार करुनच फ्रँचायझीने विल्यमसनला सोडण्याचा निर्णय घेतला असावा. 


हे देखील वाचा-