IPL Player Mini Auction 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) या 16 व्या हंगामासाठी आज होणाऱ्या मिनी ऑक्शन (IPL Player Auction 2023) पार पडणार आहे. अवघ्या काही तासांत या लिलावाला सुरुवात होईल. या ऑक्शनमध्ये अनेक मोठ्या खेळाडूंवर लक्ष असणार आहे. पण यासोबतच काही अनकॅप्ड भारतीय खेळाडूवर देखील लक्ष असेल. हे असे खेळाडू आहेत ज्यांनी अलीकडच्या काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. पण पण क्रिकेट विश्वात त्यांना अद्याप पसंती मिळालेली नाही. अशा नव्या खेळाडूंना चांगली संधी मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


गेल्या वर्षभरात देशांर्तगत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिलं नाव पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा अष्टपैलू खेळाडू सनवीर सिंह याचं  आहे. सनवीर हा मध्यम गती गोलंदाज आहे. त्याच्याकडे मोठे षटकार मारण्याची क्षमता आहे. हा खेळाडू फिरकीपटूंसमोर चांगली फलंदाजी करू शकतो.


तसेच या यादीत एन जगदीशन याचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्या टीम विकेटकीपरसाठी बॅकअपच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी तामिळनाडूचा एन जगदीशन याला संघात सामील करणं हे लक्ष्य असेल. जगदीशनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये पाच शतकं ठोकत दमदार कामगिरी केली आहे.






'या' पाच खेळाडूंवरही मोठी बोली लागण्याची शक्यता


दरम्यान, मिनी ऑक्शनमध्ये आणखी काही खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. विदर्भाचा वेगवान गोलंदाज यश ठाकूर, हिमाचल प्रदेशचा फिनिशर आकाश वशिष्ठ याच्यासह दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करण्याची क्षमता असणारा वैभव अरोरा यांच्यावरही फ्रेंचायझींचं लक्ष असेल. या तिघांव्यतिरिक्त संघांची नजर जम्मू-काश्मीरच्या शाहरुख दार आणि मुजतबा युसूफ यांच्यावरही असेल.


संघांकडे 87 खेळांडूची जागा रिक्त 


यावेळी आयपीएल फ्रँचायझीकडे मिनी लिलावासाठी 87 खेळाडूंच्या जागा रिक्त आहेत. यामध्ये 30 स्लॉटवर विदेशी खेळाडूंची निवड करता येईल तर, 57 जागा भारतीय खेळाडूंसाठी असतील. यंदाच्या लिलावात 400 हून अधिक खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात संघांकडे एकूण 206.5 कोटी रुपये रक्कम आहे.