Naveen ul haq Unsold IPL 2025 Mega Auction : विराट कोहलीची गणना जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये केली जाते. मैदानावर त्याची चपळता दिसून येते. आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या नवीन उल हकसोबत विराटचा जोरदार वाद झाला. यानंतर दोन्ही खेळाडूंना दंडही ठोठावण्यात आला. आता एलएसजीकडून खेळणाऱ्या नवीनला आयपीएल 2025 मेगा लिलावात एकही खरेदीदार मिळाला नाही. त्याच्यासाठी कोणत्याही संघाने बोली लावलेली नाही.
नवीन उल हक 2023 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. आयपीएल 2024 मध्ये, त्याने लखनऊ सुपर जायंट्ससाठी एकूण 10 सामने खेळले. त्याने आतापर्यंत 18 आयपीएल सामन्यांमध्ये एकूण 25 विकेट घेतल्या आहेत. लखनऊ संघाने त्याला या हंगामात कायम ठेवले नाही. यामुळे तो लिलावात न विकला गेला, त्यामुळे त्याची आयपीएल कारकीर्द धोक्यात आली आहे.
एकदिवसीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती
25 वर्षीय नवीन उल हकने 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र तो टी-20 क्रिकेटमध्ये सतत खेळत होता. त्याने जगभरातील लीगमध्ये आपली प्रतिभा दाखवली आहे. तो लंका प्रीमियर लीग, टी20 ब्लास्ट आणि बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळला आहे. त्याने अफगाणिस्तानसाठी 15 एकदिवसीय आणि 38 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
विराट कोहलीसोबत झाला होता जोरदार वाद
आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि आरसीबी यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये एलएसजीकडून खेळणारा कोहली आणि नवीन उल हक यांच्यात वाद झाला होता. मॅचमध्ये नवीन हातवारे करून विराट कोहलीला काहीतरी म्हणाला होता. त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये वादावाद झाला. मग जेव्हा सामना संपला. त्यानंतर कोहली सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन करत होता, त्यात नवीन रागाने कोहलीला काहीतरी म्हणाला. येथे प्रकरण आणखी बिघडले. त्यानंतर सीमारेषेजवळ उभा असताना कोहली काइल मेयर्सला काहीतरी म्हणतो, तेव्हा लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर येतो आणि मेयर्सला कोहलीपासून दूर घेऊन जातो. त्यानंतर त्याचा कोहलीसोबत वाद झाला.
हे ही वाचा -