IPL Media Rights Auction : क्रिकेटवेड्या भारतीयांसाठी आयपीएल म्हणजे एखाद्या उत्सवाप्रमाणे असते. त्यामुळे हे सामने पाहण्यासाठी कोट्यवधी प्रेक्षकांची उत्सुक असतात. ज्यामुळे या सामन्यांचे प्रक्षेपण हक्क तब्बल 48 हजार 390 कोटींना विकले गेले. पण यावेळी एक खास गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे यंदा डिजीटल राईट्स आणि टीव्ही राईट्सच्या विक्रीमध्ये फार फरक दिसून आला नाही. 23 हजार 575 कोटींना टीव्ही राईट्स विकले गेले असले तर डिजीटल राईट्सची विक्री 20 हजार 500 कोटींना झाली. ज्यामुळे या दोन्हीमध्ये केवळ 3 हजार 75 कोटींचा फरक असल्याने डिजीटल प्लॅटफॉर्मवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढत असल्याचं सिद्ध झालं आहे.


आयपीएल प्रसारण हक्कांसाठी मागील लिलाव 2017 साली पार पडला होता. त्यावेळी स्टार इंडियानं 2022 पर्यंत साठी प्रसारण हक्क 16 हजार 347.50 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यामुळे याआधीच्या लिलावात जितक्याला सर्व पॅकेज विकले गेले होते. त्याहूनही अधिक यंदा एकट्या डिजीटल राईट्सच्या हक्कांची विक्री झाली आहे. 


असा पार पडला लिलाव


आयपीएलच्या पुढील पाच हंगामासाठी म्हणजेच 2023 ते 2027 या कालावधीत आयपीएल प्रसारण हक्कांसाठीची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली. भारतीय उपखंडासाठी टिव्ही आणि डिजिटल हक्क, तसंच प्लेऑफच्या निवडक सामन्यांसाठीचे हक्क आणि परदेशात आयपीएळ सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क अशा एकूण चार पॅकेज्सची विक्री यावेळी झाली. हा संपूर्ण व्यवहार 48 हजार 390 कोटींमध्ये झाला आहे. यावेळी टीव्हीसाठीचे हक्क डिजनी स्टारने आपल्याकडे कायम ठेवले यासाठी त्यांनी 23 हजार 575 कोटी रुपये मोजले. तर डिजीटल प्लॅटफॉर्मसाठीचे हक्क 20 हजार 500 कोटींना वायकॉम 18 कंपनीला विकले गेले आहेत. 


आयपीएलच्या 410 सामन्यांसाठी या हक्कांची विक्री झाल्याने एका सामन्यातून जवळपास 107 कोटींची कमाई बीसीसीआय करणार आहे. यामध्ये टीव्हीच्या माध्यमातून एका सामन्यांतून जवळपास 57 कोटी तर डिजीटल प्लॅटफॉर्मवर एका सामन्यातून 50 कोटींची कमाई बीसीसीआय करेल. याशिवाय पॅकेज सीमध्ये एका सीजनच्या 18 निवडक सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क असणार आहे. हे पॅकेज वायकॉम 18 ने 2 हजार 991 कोटींना विकत घेतले आहे. तर तर चौथं पॅकेज ज्यात भारतीय उपमहाद्वीपच्या बाहेरील टीव्ही आणि डिजीटल ब्रॉडकास्टचे राइट्स असतील. हे पॅकेज वायकॉम 18 आणि टाईम्स इंटरनेट यांनी मिळून 1 हजार 324 कोटींना विकत घेतले आहे.


हे देखील वाचा-