IPL Fastest Delivery: आयपीएल ही जगभरातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या लीग पैकी एक आहे. आयपीएलमध्ये सतत काहीतरी नवीन विक्रम रचले जातात. आयपीएलमध्ये केवळ फलंदाजांनीच नव्हे तर तर गोलंदाजांनीही आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर छाप सोडली आहे. दरम्यान, वेगवान गोलंदाजांनी आपल्या स्विंग आणि वेगानं सर्वांचं मन जिंकली आहेत. आयपीएलच्या इतिहासात अनेक वेगवान गोलंदाजांनी आपल्या वेगानं फलंदाजांना थक्क केलं आहे. या यादीत भारताचा युवा खेळाडू उमरान मलिकच्या नावाचाही समावेश आहे. तर, आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूंचं नाव जाणून घेऊयात.
एनरिक नोर्किया– 156.22 kmph, 155.21 kmph, 154.74 kmph, 154.21 kmph
एनरिक नोर्किया हा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज आहे. त्यानं अनेक सामन्यात वेगवान चेंडू टाकून संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय. आयपीएलमध्ये सर्वात वेगान गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजामध्येही त्याचं नाव आहे. त्यानं 2022 मध्ये राजस्थानविरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकला होता. त्यावेळी जॉस बटलर फलंदाजी करत होता. त्याची गोलंदाज पाहून जॉस बटलर थक्क झाला होता.
डेल स्टेन-154.40 kmph
जगभरातील खतरनाक गोलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनचं नाव आवर्जून घेतलं जात. तो दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्यानं आयपीएलमध्ये 2012 मध्ये डेक्कन चार्जसकडून खेळताना जवळपास 155 किलोमीटर प्रतितास वेगानं गोलंदाजी केली होती.
कगिसो रबाडा-154.23 kmph, 153.91 kmph
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडानं मागच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यानं तब्बल 16 वेळा 150 किलोमीटर प्रतितास वेगानं गोलंदाजी केली होती. त्याची 154.23 ही आयपीएलमधील उत्तम कामगिरी आहे.
लॉकी फर्ग्यूसन-153.84 KMpH
फर्ग्युसन गेल्या अनेक वर्षांपासून जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. आयपीएल 2020 मध्ये त्यानं आपल्या वेगाची जादू दाखवली. जिथे त्यानं 153.84 किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी केली.
जोफ्रा आर्चर - 153.62 kmph
जोफ्रा आर्चर त्याच्या वेगासाठी जगभरात ओळखला जातो. आयपीएलच्या सर्वात वेगवान गोलंदाजांच्या यादीतही त्यानं आपलं नाव नोंदवलं आहे. त्यानं आयपीएलमध्ये 153.62 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. त्यानंतर तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सामील झाला.
उमरान मलिक
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान गोलंदाज चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाच्या उमरान मलिक भारताचा एकमेव गोलंदाज आहे. त्यानं आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 151.03 किलोमीटर प्रतितास वेगानं चेंडू टाकून सर्वांना आश्चर्यचकीत केलं होतं. त्याच्याआधी नवदीप सैनीच्या नावावर हा विक्रम होता.
हे देखील वाचा-
- RCB vs DC: विराटनं एका हातान झेल पकडल्यानंतर अनुष्कानं दिली 'अशी' प्रतिक्रिया, व्हिडिओ होतोय व्हायरल
- PBKS vs SRH, IPL 2022: हैदराबादविरुद्ध सामन्यात शिखर धवन पंजाबचा कर्णधार; मयांक अग्रवाल संघाबाहेर, नेमकं कारण काय?
- Shane Watson on Mumbai Indians: ईशान किशनवर 15 कोटी खर्च करणं मुंबईची सर्वात मोठी चूक- शेन वॉटसन