एक्स्प्लोर

IPL : चीअर लीडर्सची आयपीएलमधील कमाई ऐकाल तर हैराण व्हाल

IPL 2024 Cheerleaders Income : प्रत्येक सामन्यावेळी प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या चीअरलीडर्सला किती मानधन मिळते? याबाबत तुम्हाला काही माहितेय का?

IPL 2024 Cheerleaders Income : आयपीएलच्या 17 व्या पर्वाला (IPL 2024)  दिमाखात सुरुवात झाली आहे. चेन्नई आणि आरसीबी (CSK vs RCB) यांच्यातील सामन्याने स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून आयपीएलची (IPL) नेहमीच चर्चा असते. खेळाडूंवर येथे कोट्यवधींची बोली लागते. त्यामुळे जगभरातील क्रिकेटपटू येथे आपले नशीब अजमावतात... जगभरातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंपासून ते स्पॉन्सर्स आणि फ्रेंचायझी म्हणून मोठमोठाले उद्योगपती या लीगशी संबंधित आहेत. प्रत्येक सामन्यावेळी प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या चीअरलीडर्सला किती मानधन मिळते? याबाबत तुम्हाला काही माहितेय का?

आयपीएलमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या काही चीअरलीडर्स या भारतीय आहेत, पण बहुतांश चीअरलीडर्स या विदेशी आहेत. या चीअरलीडर्सचा पगार किती? एका दिवसात त्या किती रुपये कमवतात? याबद्दल तुम्हाला माहितेय का? पाहूयात त्याबद्दल.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीअर लीडर्सना एका सामन्यासाठी 12 ते 20 हजार रुपये दिले जातात. त्याशिवाय त्यांच्या परफॉर्मनुसार विशेष बोनसही दिला जाते. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलसाठी प्रत्येक संघ चीअर लीडर्सबरोबर करार करतो. आयपीएलच्या प्रत्येक सामन्यानुसार चीअर लीडर्सला सरासरी 12 ते 20 हजार रुपयांचे मानधन दिले जाते. चेन्नई, पंजाब, हैदराबाद, दिल्ली या संघाकडून चीअरलीडर्सला प्रत्येक सामन्यागणिक 12 हजार रुपये दिले जातात. राजस्थानकडून 14 ते 15 हजार रुपये दिले जातात.  तर मुंबई आणि आरसीबी या संघाकडून प्रत्येक सामन्यानंतर 20 हजार रुपये दिले जातात. केकेआरकडून सर्वाधिक 22 हजार रुपये प्रत्येक सामन्यानंतर दिले जातात. 

याचाही लाभ 

प्रत्येक सामन्याशिवाय चीअरलीडर्सला इतर मानधनही दिले जाते. हे मानधन त्यांच्या कामगिरीच्या आधारवर असते. एखादा संघ जिंकला तर त्यांना बोनस दिला जातो. त्याशिवाय चैनीच्या वस्तू आणि खाद्यपदार्थ इत्यादींचा लाभ फ्रेंचायझीकडून मिळतो. एखादा संघ फायनलपर्यंत पोहोचला तर वेगळा बोनस दिला जातो. मॅच झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी होणाऱ्या पार्टीमध्ये गेल्यास त्यांना अधिकची कमाई करता येते.  

चीअर लीडर्सची निवड कशी होते ?

आयपीएलमध्ये चीअर लीडर्सचे काम अथवा नोकरी सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत. आयपीएल चीअरलीडरला डान्स, मॉडेलिंग आणि गर्दीसमोर परफॉर्म करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याशिवाय चीअर लीडर्सला आपले शरीर लवचीक ठेवावे लागते. फक्त डान्स करून चालत नाही तर संघातील खेळाडूंना, चाहत्यांना प्रोत्साहन कसे देता येईल, याचा विचारही त्यांना करावा लागतो.   

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Embed widget