IPL Auction Highlights : मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि डॅरिल मिशेल यांसारख्या खेळाडूंवर आयपीएल लिलावात पैशांचा वर्षाव करण्यात आला. त्याच वेळी, स्टीव्ह स्मिथ, रेली रॉसो, लॉकी फर्ग्युसन आणि मनीष पांडे यांसारख्या खेळाडूंसाठी संघांनी बोली लावली नाही. तसेच अनेक खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे पैसे मिळाले नाहीत. चेतन साकारिया, ट्रस्टन स्टब्स, रचिन रवींद्र या खेळाडूंना चांगली किंमत मिळेल, असे मानले जात होते, मात्र अपेक्षेप्रमाणे पैसे मिळाले नाहीत. पाहूयात त्या दहा खेळाडूंबद्दल, ज्यांना अपेक्षाइतकी रक्कम मिळाली नाही... 


चेतन सकारिया- भारतीय वेगवान गोलंदाज चेतन साकारियाची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. पण कोलकाता नाईट रायडर्स व्यतिरिक्त कोणत्याही संघाने बोली लावली नाही. त्यामळे  चेतन साकारिया मूळ किंमतीमध्येच विकला गेला. त्याच्यावर मोठी बोली लागेल, असा अंदाज वर्तवला जात होता. 


ट्रस्टन स्टब्स- दिल्ली कॅपिटल्सने दक्षिण आफ्रिकेचा विकेटकिपर फलंदाज ट्रस्टन स्टब्सला 50 लाखांच्या मूळ किमतीत घेतले.


रचिन रवींद्र- विश्वचषक गाजवणारा न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रला चेन्नई सुपर किंग्सने 1.80 कोटी रुपयांना विकत घेतले.


क्रिस वोक्स- पंजाब किंग्जने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सला 4.20 कोटी रुपयांमध्ये ताफ्यात घेतले. 


शार्दुल ठाकुर- भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर याला चेन्नईने चार कोटी रुपयात खरेदी केले.


हॅरी ब्रूक- इंग्लंडचा युवा हॅरी ब्रूक याला दिल्ली संघाने चार कोटी रुपयात खरेदी केले. मागील लिलावात त्याला 13 कोटी रुपये बोली लागली होती. 


अजमतुल्लाह उमरजई- अफगानिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अजमतुल्लाह उमरजई याला गुजरातने 50 लाख रुपयांत खरेदी केले. उमरजई याच्यावर लिलावात मोठी बोली लागेल, असा अंदाज वर्तवला जात होता.


गेराल्ड कोएत्जी- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्जी याला मुंबईने पाच कोटींमध्ये खरेदी केले. त्याच्यावर 10 कोटींपेक्षा जास्त पैशांचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला जात होता. 


वानिंदु हसारंगा- श्रीलंकेचा अष्टपैलू वानिंदु हसारंगा याला सनराइजर्स हैदराबादने 1.5 कोटींमध्ये खरेदी केले. त्याच्यावर 10 कोटींपेक्षा जास्त बोली लागेल, असा अंदाज वर्तवला जात होता.


केएस भारत- भारतीय विकेटकीपर केएस भारत याला कोलकात्याने 50 लाख रुपयात खरेदी केले.  


अनसोल्ड राहिलेले खेळाडू -


स्टीव स्मिथ
करुण नायर
मनिष पांडे
रीली रॉसो
जोश इंग्लिस
फिल साल्ट
कुसल मेंडिस
तबरेज शम्सी 
अदिल रशीद 
वकार सलामखेल
मुजीब आर रहमान
ईश सोढी
अकिल हुसैन
शाकीब अल हसन 


आणखी वाचा :


IPL Auction 2024 : स्मिथ, हेजलवूडसह दिग्गज अनसोल्ड, या दिग्गजांवर बोलीच नाही