मुंबई : आयपीएल 2024 च्या ऑक्शनमध्ये (IPL 2024 Auction) ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि पॅट कमिंस (Pat Cummins) यांना सर्वाधिक बोली लावण्यात आली. याशिवाय अनेक नवख्या खेळाडूंवर देखील मोठ्या आकड्यांची बोली लावण्यात आली आहे. विदर्भाकडून खेळणाऱ्या शुभम दुबेला (Shubham Dube) राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) 5 कोटी 80 लाख रुपयांना खरेदी केले आहे. शिवमची बेस प्राईस ही 20 लाख रुपये होती. राजस्थानने शुभम 29 पट अधिक रक्कम देऊन विकत घेतलं. 


दिल्ली कॅपिटल्सने शुभमवर पहिली बोली लावली होती. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये जोरदार बिडिंग झाले. दिल्लीने शिवम दुबेवर 5.60 कोटींची शेवटची बोली लावली. पण यानंतरही राजस्थानने बाजी मारली. राजस्थानने शुभमला 5.80 कोटी रुपयांना खरेदी केले. लिलावात विकल्यानंतर शुभमचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याची अजूनही अनेकांना ओळख नव्हती. राजस्थान रॉयल्सनेही शुभमचा एक फोटो शेअर केला आहे.






शुभम दुबेच्या करिअरचा प्रवास


शुभम दुबे देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळतो आणि तो मोठे शोट्स मारण्यात माहीर आहे. शुभमला अजून खूप सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण त्याने प्रभावी कामगिरी केली आहे. शुभमनने 20 टी-20 सामन्यात 485 धावा केल्या आहेत. या कालावधीत एक अर्धशतक झळकावले आहे. त्याने 8 लिस्ट ए सामन्यात 159 धावा केल्या आहेत. या काळात शुभमची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद 62 धावा. शुभम दुबेने यावर्षी लिस्ट ए मध्ये पदार्पण केले आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये मेघालय विरुद्ध त्याने विदर्भासाठी पहिला सामना खेळला. नोव्हेंबर 2021 मध्ये विदर्भासाठी मणिपूर विरुद्ध पहिला T20 सामना खेळला गेला.


समीर रिझवीवरही कोट्यावधी रुपयांची बोली


समीर रिझवी हा भारताचा देशांतर्गत सामने खेळणारा अनकॅप्ड खेळाडू असून त्याच्यावर चेन्नईच्या संघाने 8 कोटींची बोली लावली आणि संघात सामील करुन घेतलं. यावेळी चेन्नई आणि गुजरातच्या संघामध्ये जोरदार बिडींग झालं. पण यामध्ये चेन्नईने बाजी मारत त्याला आपल्या संघात सामील करुन घेतलं. उत्तर प्रदेशाच्या या खेळाडवर चेन्नईने 8 कोटी 40 लाख रुपयांची बोली लावली.  रिझवीवर बोली लावण्यात चेन्नई आणि गुजरात अव्वल होते, त्यानंतर दिल्लीने देखील त्यांच्यात सहभाग घेतला. त्यानंतर दिल्लीने त्याच्यावर 7 कोटी 60 लाख रुपयांची बोली लावली. पण त्यांनाही मागे सारत चेन्नईने 8 कोटी 40 लाख रुपये देत समीर रिझवीला आपल्या संघात सामील करुन घेतले. 


हेही वाचा : 


IPL Auction 2024 : ना आंतरराष्ट्रीय सामने खेळला, ना मोठ्या सामन्यांचा अनुभव, देशांतर्गत 11 सामने खेळलेल्या क्रिकेटपटूवर CSK ची 8.4 कोटींची बोली