IPL Auction 2024 : दुबईमध्ये सुरु असलेल्या आयपीएल लिलावात स्टीव्ह स्मिथ आणि मनीष पांडे यांसारख्या खेळाडूंवर संघांनी बोली लावली नाही. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड यालाही खरेदी करण्यासाठी कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. या यादीत भारताच्या करुण नायर याचाही समावेश आहे. 333 खेळाडू मिनी आयपीएल लिलावात सहभागी झाले आहेत. त्यामधील फक्त 77 खेळाडू विकले जाणार आहेत. स्टार्क, कमिन्स, हर्षल पटेल अन् अल्जारी जोसेफ यासारख्या खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली, पण काही दिग्गज अनसोल्ड राहिले. 


पहिल्या टप्प्यात न विकलेल्या खेळाडूंना पुन्हा संधी मिळणार आहे. या लिलावाच्या शेवटी, या न विकल्या गेलेल्या खेळाडूंसाठी पुन्हा बोली लावली जाईल. पण यामधील बऱ्याच खेळाडूंवर पुन्हा बोली लागण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे स्मिथसारख्या दिग्गजावर अनसोल्ड राहण्याची वेळ आली आहे. 


स्टिव्ह स्मिथ अनसोल्ड - 


ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्टिव्ह स्मिथ अनसोल्ड राहिला. स्मिथने आयपीएलमध्ये राजस्थान संघाचे नेतृत्वही केलेय. पण मागील काही दिवसांपासून स्मिथचा फॉर्म खराब होता, त्यामुळेच त्याला खरेदी करण्यास कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. तो अनसोल्ड राहिला. त्याची मूळ किंमत दोन कोटी रुपये इतकी होती. स्मिथशिवाय जोश हेजलवूड आणि लॉकी फर्गुसन यांच्यावर मोठी बोली लागेल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण त्यांना खरेदी करण्यास कुणीही रस दाखवला नाही. दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाजी रीलो रुसोही लिलावात अनसोल्ड राहिला. त्याची बेस प्राईज दोन कोटी रुपये इतकी होती. भारतीय फलंदाज मनिष पांडे आणि करुण नायर यांनाही कुणीही खरेदीदार मिळाला नाही. आयपीएलमध्ये शतक ठोकणारा मनिष पांडे पहिला भारतीय फलंदाज होता, पण मागील हंगामात त्याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही, त्यामुळे त्याला खरेदी करण्यास कुणीही रस दाखवला नाही.


 
अनसोल्ड राहिलेले खेळाडू -


स्टीव स्मिथ
करुण नायर
मनिष पांडे
रीली रॉसो
जोश इंग्लिस
फिल साल्ट
कुसल मेंडिस
तबरेज शम्सी 
अदिल रशीद 
वकार सलामखेल
मुजीब आर रहमान
ईश सोढी
अकिल हुसैन


अलीकडेच ऑस्ट्रेलियन खेळाडू जोश इंग्लिसने भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत झंझावाती शतक झळकावले होते. मात्र आजच्या लिलावात त्याच्यावर कुणीही बोली लावली नाही. जोश इंग्लिसला चांगले पैसे मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला जात होता, परंतु संघांनी रस दाखवला नाही. याशिवाय इंग्लंडचा फिल सॉल्ट आणि श्रीलंकेचा कुसल मेंडिस यांना खरेदीदार मिळाले नाहीत.


आणखी वाचा :


मिचेल स्टार्क आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू, क्षणात कमिन्सला टाकले मागे, चार संघामध्ये चुरस