Shoaib Akhtar On IPL Auction: पाकिस्तानच्या 'या' खेळाडूवर लागू शकते 20 कोटींची बोली, माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचं वक्तव्य

Shoaib Akhtar On IPL Auction: याशिवाय, बाबर आझम आणि विराट कोहलीसोबत एकत्र आयपीएल खेळताना पाहायला आवडेल, असंही शोएब अख्तरनं म्हटलंय.

Continues below advertisement

Shoaib Akhtar On IPL Auction: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं पाकिस्तानी क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार बाबर आझमसाठी आयपीएलच्या ऑक्शनमध्ये 15 ते 20 कोटींची बोली लागू शकते, असं वक्तव्य केलंय. तसेच बाबर आझम (Babar Azam) आणि विराट कोहलीसोबत (Virat Kohli) एकत्र आयपीएल खेळताना पाहायला आवडेल, असंही शोएब अख्तरनं म्हटलंय. आयसीसीच्या (ICC) एकदिवसीय आणि टी-20 फलंदाजाच्या क्रमवारीत बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे. 

Continues below advertisement

आयपीएलचे आतापर्यंत एकूण चौदा पर्व झाले आहेत. तर, पंधराव्या हंगामाला नुकतीच 26 मार्चपासून सुरुवात झालीय. आयपीएलच्या पहिल्या हंगामात पाकिस्तानचे खेळाडू खेळताना दिसले होते. परंतु, त्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवरील तणावामुळं पाकिस्तानी खेळाडूंशिवाय आयपीएलचं आयोजन केलं जातं आहे. यावर शोएब अख्तर म्हणाला की, जर आयपीएलच्या ऑक्शनमध्ये बाबर आझमवर बोली लागली तर, त्याची किंमत 15 ते 20 कोटींवर जाऊ शकते. एवढेच नव्हेतर तर, विराट कोहली आणि बाबर आझमला सलामीवीर म्हणून एकत्र खेळाताना पाहायला आवडेल, असंही अख्तरनं म्हटलंय. 

आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच 2008 मध्ये पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी, मिसाब-उल-हक, सोहेल तन्वीर, कमरान अकमाल, सलमान भट्ट, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, उमर गुल, युनिस खान, मोहम्मद आसिफ आणि शोएब अख्तर खेळताना दिसले होते. त्यावेळी शाहीद आफ्रिदी हा आयपीएलमधील पाकिस्तानचा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. डेक्कन चार्जर्सच्या संघानं त्याला विकत घेतलं होतं.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola