IPL Player Auction 2024 : आयपीएल 2025 मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात केन विल्यमसनच्या नावाने झाली. न्यूझीलंडचा हा दिग्गज फलंदाज लिलावाच्या पहिल्या फेरीत विकला गेला नाही. त्याच्यानंतर विल्यमसनचा देशबांधव आणि त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी जगप्रसिद्ध ग्लेन फिलिप्सही विकला गेला नाही. पण वेस्ट इंडिजचा तेजस्वी खेळाडू रोव्हमन पॉवेल याला कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) त्याच्या मूळ किंमत 1.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
मुंबईकरांना मिळाला नाही ऑप्शनमध्ये कोणता भाव!
भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे मूळ किंमत 1.50 कोटी घेऊन मैदानात उतरला आणि कोणत्याही संघाने त्याला घेण्यास रस दाखवला नाही. पृथ्वी शॉमध्ये कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. त्याची मूळ किंमत 75 लाख रुपये होती. भारताचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर पहिल्या डावात न विकला गेला. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. हे तिन्ही खेळाडू मुंबईकडून रणजी खेळतात. पण त्यांना कोणी विकत घेतले नाही. मयंक अग्रवालला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही ज्याची मूळ किंमत 1 कोटी रुपये आहे.
दुसऱ्या दिवशी आता पर्यंत इतके खेळाडू गेले विकल्या....
वॉशिंग्टन सुंदरला गुजरात टायटन्सने 3.20 कोटी रुपयांना विकत घेतले. सुंदरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. चेन्नई सुपर किंग्जने इंग्लंडच्या सॅम करनसाठी 2.40 कोटी रुपयांची बोली लावली आणि त्याला आपल्या संघात समाविष्ट केले. सॅमची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.तर मार्को जेन्सनची मूळ किंमत 1.25 कोटी रुपये होती. पंजाब किंग्जने त्याला 7 कोटी रुपयांना खरेदी केले. कृणाल पांड्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. कृणालला आरसीबीने 5.75 कोटी रुपयांना खरेदी केले. लखनऊमध्ये आरटीएमचा पर्याय होता, पण त्यांनी तो कृणालसाठी वापरला नाही.