IPL 2025 Mega Auction: आयपीएल 2025 मेगा लिलावाच्या पहिल्या ( IPL Auction 2025 Day 2 ) रेकॉर्डब्रेक बोली झाली. काही खेळाडूंना अपेक्षेपेक्षा मोठ्या बोली लागल्या आहेत, तर काही फ्रँचायझी अनेक खेळाडूंना स्वस्तात विकत घेत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकीपर ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. गेल्यावर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या रिषभ पंतला मेगा ऑक्शनमध्ये लखनौ सुपर जाएंटसनं 27 कोटींची बोली लावत संघात घेतलं. मेगा लिलावाच्या पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातील अनेक दिग्गज खेळाडूंना विकत घेण्यात आले.
आज आयपीएलच्या मेगा लिलावाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी देखील अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. दुपारी 3.30 वाजता लिलावाला सुरुवात होईल. सध्या लिलावासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे जास्त पैसे शिल्लक आहे. दुसऱ्या दिवशी लिलावासाठी कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक आहेत, जाणून घ्या...
कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? ( Team Squad Purse Remaining )
चेन्नई सुपर किंग्स - 15.60 कोटी रुपये
दिल्ली कॅपिटल्स- 13.80 कोटी रुपये
गुजरात टायटन्स- 17.50 कोटी
कोलकाता नाईट रायडर्स- 10.05 कोटी
लखनौ सुपर जायंट्स – 14.85 कोटी रुपये
मुंबई इंडियन्स- 6.10 कोटी रुपये
पंजाब किंग्स- 22.50 कोटी रुपये
राजस्थान रॉयल्स- 17.35 कोटी रुपये
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – 30.65 कोटी रुपये
सनरायझर्स हैदराबाद – 5.15 कोटी रुपये
आयपीएलच्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक संघाने घेतलेले खेळाडू पुढील प्रमाणे-
लखनऊ सुपर जायंट्स-
ऋषभ पंत (27 कोटी), आवेश खान (9.75 कोटी), डेव्हिड मिलर (7.50 कोटी), अब्दुल सामद (4.20 कोटी), मिचेल मार्श (3.40 कोटी), एडेन मार्करम (2 कोटी), आर्यन जुएल (30 लाख)
पंजाब किंग्स-
श्रेयस अय्यर (26.75 कोटी), युझवेंद्र चहल (18 कोटी), अर्शदीप सिंग (18 कोटी RTM), मार्कस स्टॉयनिस (11 कोटी), नेहल वढेरा (4.20 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (4.20 कोटी), हरप्रीत ब्रार (1.50 कोटी), विष्णू विनोद (95 लाख), विजय कुमार वैशाख (1.80 कोटी), यश ठाकूर (1.60 कोटी)
चेन्नई सुपर किंग्स-
आर अश्विन (9.75 कोटी), डेवॉन कॉनवे (6.25 कोटी), खलील अहमद (4.80 कोटी), रचिन रविंद्र (4 कोटी RTM), राहुल त्रिपाठी (3.40 कोटी), विजय शंकर (1.20 कोटी), नूर अहमद (10 कोटी)
गुजरात टायटन्स-
जॉस बटलर (15.75 कोटी), मोहम्मद सिराज (12.25 कोटी), कागिसो रबाडा (10.75 कोटी), प्रसिद्ध कृष्णा (9.50 कोटी), महिपाल लोमरोर (1.70 कोटी), कुमार कुशाग्र (65 लाख), अनुज रावत (30 लाख), निशांत सिंधू (30 लाख), मानव सुतार (30 लाख)
दिल्ली कॅपिटल्स-
केएल राहुल (14 कोटी), मिचेल स्टार्क (11.75 कोटी), टी नटराजन (10.75 कोटी), जॅक फ्रेझर-मॅकगर्क (9 कोटी), हॅरी ब्रुक (6.25 कोटी), आशुतोष शर्मा (3.80 कोटी), समीर रिझवी (95 लाख), करुण नायर (50 लाख), मोहित शर्मा (2.20 कोटी)
कोलकाता नाईट रायडर्स-
वेंकटेश अय्यर (23.65 कोटी), एन्रिच नॉर्किया (6.50 कोटी), क्विंटन डी कॉक (3.60 कोटी), अंगक्रिश रघुवंशी (3 कोटी), रेहमनुल्ला गुरबाज (2 कोटी), वैभव अरोरा (1.80 कोटी), मयंक मार्कंडे (30 लाख)
मुंबई इंडियन्स-
ट्रेंट बोल्ट (12.50 कोटी), नमन धीर (5.25 कोटी RTM), रॉबिन मिन्झ (65 लाख), कर्ण शर्मा (50 लाख)
राजस्थान रॉयल्स-
जोफ्रा आर्चर (12.50 कोटी), वनिंदू हसरंगा (5.25 कोटी), महिश तिक्षणा (4.40 कोटी), आकाश मधवाल (1.20 कोटी), कुमार कार्तिकेय (30 लाख)
सनरायझर्स हैदराबाद-
इशान किशन (11.25 कोटी), मोहम्मद शमी (10 कोटी), हर्षल पटेल (8कोटी), अभिनव मनोहर (3.20कोटी), राहुल चाहर (3.20 कोटी), ऍडम झाम्पा (2.20 कोटी), सिमरजीत सिंग (1.50 कोटी), अथर्व तायडे (30 लाख)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-
जोश हेजलवूड (12.50 कोटी), फिल सॉल्ट (11.50 कोटी), जितेश शर्मा (11 कोटी), लियाम लिव्हिंगस्टोन (8.75कोटी), रसिक दार (6 कोटी), सुयश शर्मा (2.60 कोटी)
संबंधित बातमी:
Virat Kohli: अनुष्का शर्मा नव्हे..., शतक झळकवल्यानंतर विरोट कोहलीने कोणाला कडकडून मिठी मारली?, Video