IPL Auction 2025 Most Expensive Player Rishabh Pant : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाचा पहिला तास खूपच रोमांचक होता. सुरुवातीला कोलकाता नाइट रायडर्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते, मात्र काही वेळातच हा विक्रम मोडला गेला. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.


लखनऊने यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला 27 कोटींना खरेदी केले आहे. त्यामुळे पंत आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक किंमतीला विकला जाणारा खेळाडू बनला आहे. यामध्ये त्याने अवघ्या 10 मिनटात श्रेयस अय्यरला मागे सोडले आहे, जो थोड्याच वेळापूर्वी 26.75 कोटी रुपयांना विकला गेला होता. 






पंत 2 कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता आणि अल्पावधीतच त्याची किंमत 10 कोटींच्या पुढे गेली होती. त्यानंतर ऋषभ पंतसाठी लखनऊ आणि आरसीबी यांच्यात सुरुवातीला सामना रंगला होता. पण लखनऊनेही हार मानली नाही. हैदराबादचे मालक काव्या मारन आणि लखनऊचे मालक संजय गोयंका यांनी पंतसाठी लिलावाच्या टेबलावर बोली लावली आणि काही वेळातच त्याची किंमत 17 कोटींच्या पुढे गेली. 






हैदराबाद आणि लखनऊ इथेच थांबले नाहीत आणि पंतवरील बोली वाढतच गेली. लखनऊने पंतसाठी 20.75 कोटी रुपयांची बोली लावली आणि हैदराबादने माघार घेतली. मात्र, दिल्लीने आरटीएमचा वापर केला. यानंतर लखनऊने पंतसाठी 27 कोटींची ऑफर दिली आणि दिल्लीने हात मागे घेतला. अशाप्रकारे पंतला 27 कोटी रुपयांना विकले गेले आणि लखनऊने त्याला आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू म्हणून नेले.






पंतची आयपीएल कारकीर्द 


ऋषभ पंत आयपीएलच्या 8 हंगामात 111 सामन्यांमध्ये 17 वेळा नाबाद राहिला आहे आणि त्याने 35.31 च्या सरासरीने आणि 148.93 च्या स्ट्राइक रेटने 3248 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि 18 धावांचा समावेश आहे. पंतची नाबाद 128* ही लीगमधील त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. अपघातात जखमी झाल्याने पंत 2023 साली खेळू शकला नव्हता. पण 2024 साली त्याने 13 सामन्यात 40.55 च्या सरासरीने आणि 155.40 च्या स्ट्राईक रेटने 446 धावा केल्या. ज्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 88* ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.