IPL Auction 2022: आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हटलं की मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) तब्बल 5 वेळा जेतेपाद पटकावणाऱ्या मुंबईने यंदा त्यांचा हुकूमी एक्का हार्दीक पंड्या याला रिटेन केलेलं नाही. पण मुंबईचा दुसरा हुकूमी एक्का ईशान किशनला तब्बल 15.25 कोटी देत त्यांनी ताफ्यात सामिल केलं आहे. यंदाच्या आयपीएलमधील ही सर्वात मोठी बोली असून मुंबईचा संघ नेमका कसा आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


मुंबईने लिलावापूर्वी कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार कायरन पोलार्ड यांना रिटेन केलं होतं. या सर्वांसाठी संघाने तब्बल 42 कोटी मोजले होते. पण त्यानंतर आता लिलावात संघाला यष्टीरक्षक, फिरकीपटू, फिनीशर अशा काही महत्त्वाच्या जागांवर स्टार खेळाडूंची गरज होती. त्यानुसार त्यांनी बोली लावत सर्वात आधी यष्टीरक्षक फलंदाज आणि डावखुरा फलंदाज म्हणून ईशान किशनला तब्बल 15.25 कोटी देत संघात घेतलं. त्यानंतर सर्वात मोठी बोली म्हटलं तर त्यांनी हार्दीक पंड्याला रिप्लेसमेंट म्हणून 8.25 कोटी खर्च करत एक अष्टपैलू खेळाडू ताफ्यात घेतला. हा खेळाडू म्हणजे सिंगापूरचा युवा अष्टपैलू खेळाडू टीम डेविड (TIim David). टीम याच्यावर अवघ्या 40 लाखांची बेस प्राईस लावण्यात आली होती. ज्यानंतर केकेआर, मुंबईसारख्या संघानी त्याच्यावर बोली लावण्यास सुरुवात केली. पण सर्वाधिक पैसे बटव्यात उरलेल्या मुंबईने टीमला 8.25 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामिल केले.  


जोफ्राही मुंबईकर


संघातील अनुभवी गोलंदाज ट्रेन्ट बोल्टला राजस्थानने खरेदी केल्यामुळे संघात जसप्रीतच्या जोडीला अनुभवी गोलंदाजाची गरज होती. त्यासाठी त्यांनी इंग्लंडचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चरला विकत घेतलं आहे. तब्बल 8 कोटी मोजत त्यांनी जोफ्राला संघात सामिल करुन घेतलं आहे. मुंबईसह यावेळी राजस्थानचा संघ जोफ्राला घेण्यासाठी बोली लावत होते. हैद्राबाद संघानेही या बोलीत उडी घेतली होती. पण अखेर मुंबईने 8 कोटी रुपयांना जोफ्राला संघात घेतलं. सध्या दुखापतीमुळे मैदानावर उतरत नसणारा जोफ्रा आर्चर या आयपीएल हंगामात मैदानात उतरण्याची शक्यता कमी आहे. पण महालिलाव दरवर्षी पार पडत नसल्याने मुंबईने ही मोठी बोली लावत एक क्लासिक खेळाडू संघात घेतला आहे.  


मुंबई इंडियन्स संघ


रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी), ईशान किशन (15.25 कोटी), डेवाल्ड ब्रेविस (3 कोटी), बसिल थम्पी (30 लाख), मुरुगन आश्विन (1.6 कोटी), जयदेव उनाडकट (1.30 कोटी), मयांक मार्कंडे (65 लाख), तिलक वर्मा (1.70 कोटी), संजय यादव (50 लाख), जोफ्रा आर्चर (8 कोटी), डॅनियल सॅम्स (2.60 कोटी), फॅबियन अॅलन (75 लाख), टिमल मिल्स (1.5 कोटी), टीम डेव्हिड (8.25 कोटी), रिले मरेडिथ (1 कोटी), मोहम्मद अर्शद खान (20 लाख), अर्जून तेंडुलकर (30 लाख), रमनदीप सिंह (20 लाख), राहुल बुद्धी (20 लाख), ऋतिक शौकीन (20 लाख), आर्यन ज्युयल (20 लाख), अनोलप्रीत सिंह (20 लाख).            


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha