IPL 2021 Auction :  इंडियन प्रीमियर लीगच्या 14  व्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव आज चेन्नईत होणार आहे. या लिलाव प्रक्रियेत एकूण 291 खेळाडूंचा समावेश असणार आहे. लिलावाच्या ठीक आधी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने आपले नाव मागे घेतले आहे. मार्क वुडने आपली आधारभूत किंमत दोन कोटी रुपये ठेवली होती आणि मुंबई इंडियन्ससह अनेक संघांची त्याच्यावर नजर होती.


आयपीएलच्या 14 व्या सत्रात 1100 हून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली होती. पण आयपीएलच्या अंतिम ड्राफ्टमध्ये केवळ 292 खेळाडूंना स्थान मिळाले होते. आजच्या लिलावात जे खेळाडू उपस्थित राहतील त्यापैकी 164 भारतीय आणि 124 विदेशी खेळाडू आहेत. आजच्या लिलावात 227 खेळाडू अनकॅप्ड आहेत तर 64 खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. मात्र सर्व 8 संघांमध्ये केवळ 61 जागा रिक्त आहेत.


कोणत्या देशातील किती खेळाडूंचा यात सहभाग असेल?


आजच्या लिलावात विदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे 35, न्यूझीलंडचे 20, वेस्ट इंडिजचे 19, इंग्लंडचे 17, दक्षिण आफ्रिकेचे 14, श्रीलंका 9, अफगाणिस्तानचे 7 जणांचा समावेश आहे. याखेरीज नेपाळ, युएई आणि यूएसएमधील प्रत्येकी एक खेळाडू आजच्या लिलावात भाग घेणार आहे.


IPL Auction 2021 | लिलावाला चला तुम्ही, आयपीएलच्या लिलावाला चला...


9 खेळाडूंची बेस किंमत 2 कोटी


गुरुवारी होणाऱ्या लिलावात केदार जाधव, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ यांच्यासह 9 खेळाडू आहेत, ज्यांची बेस प्राईज दोन कोटी रुपये आहे. आजच्या लिलावात दीड कोटी रुपयांची बेस प्राईज असलेले 12 खेळाडू सहभागी होतील. तर 11 खेळाडू असे आहेत ज्यांची बेस प्राईज एक कोटी रुपये आहे.


IPL Auction 2021 live streaming | जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकाल आयपीएलचा लिलाव


सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण खेळाडू


लिलावात समाविष्ट झालेल्या 292 खेळाडूंमध्ये 42 वर्षीय नयन दोशी हा सर्वात वयाने मोठा खेळाडू आहे. आणि 16 वर्षाचा नूर अहमद सर्वात तरुण खेळाडू आहे. नयन आणि नूर अहमद यांची बेस प्राईज 20-20 लाख रुपये आहे. नयनने 2001 ते 2013 दरम्यान सौराष्ट्र, राजस्थान आणि सरे यांच्यासाठी एकूण 70 प्रथम-श्रेणी सामने खेळले आहेत. नूर अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगचा भाग होता.


IPL 2021: 292 खेळाडूंच्या नावे बोली लागणार, सचिनचा मुलगा अर्जुनला मिळणार इतके रुपये


संघात किती खेळाडू असू शकतात?


सर्व फ्रँचायझींमध्ये त्यांच्या संघात जास्तीत जास्त 25 खेळाडू आणि किमान 18 खेळाडू घेऊ शकतात. त्याचबरोबर संघात परदेशी खेळाडूंची संख्या आठ असू शकते. महत्त्वाचे म्हणजे आयपीएलच्या आठही फ्रँचायजींनी लिलावापूर्वी 139 खेळाडूंना कायम ठेवले आहे. तर 57 खेळाडूंना त्यांच्या सध्याच्या संघाने रिलीज केलं आहे. सनरायझर्स हैदराबादने सर्वाधिक खेळाडू कायम ठेवले आहेत. त्याच वेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सर्वाधिक खेळाडूंना रिलीज केलं आहे.